मुंबई : मीरा – भाईंदरमध्ये भाजपातील दुफळी चव्हाट्यावर आली आहे. माजी आमदार नरेंद्र मेहता हे पक्षावर नाराज असून, त्यांनी स्वपक्षाविरोधात बंड केल्याची चर्चा आहे. मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता यांचा एक गट तर नवनिर्वाचित शहराध्यक्ष रवी व्यास यांचा दुसरा गट असे दोन गट पडले असून, गटातटाच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. मेहता यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या संमेलनाची घोषणा केली होती. यावर प्रतिक्रिया देताना हा मेहता यांचा वैयक्तीक कार्यक्रम असून, त्याचे पक्षाशी काहीही देणे-घेणे नसल्याची प्रतिक्रिया व्यास यांनी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ही दुफळी भाजपा पक्षश्रेष्ठींच्या डोकेदुखीचे कारण ठरू शकते.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी रवी व्यास यांची मीरा भाईंदरचे शहराध्यक्ष म्हणून निवड केली. या घोषणेनंतरच भाजपातील दुफळी चव्हाट्यावर आली. माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थक आणि रवी व्यास यांच्या समर्थकांचा असे दोन गट निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहेत. मेहता यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या संमेलनाची घोषणा केली होती. यावर प्रतिक्रिया देताना हा मेहता यांचा वैयक्तीक कार्यक्रम असून, त्याचे पक्षाशी काहीही देणे-घेणे नसल्याची प्रतिक्रिया व्यास यांनी दिली आहे.
दरम्यान नरेंद्र मेहता यांनी आयोजित केलेल्या भाजपा कार्यकर्ता संमेलनात महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती , सभागृह नेता तसेच मोठ्या संख्येत भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मेहता हे शक्तीप्रदर्शन करत असल्याचे बोलले जात आहे. कार्यक्रमात बोलताना मेहता यांनी रवी व्यास यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मात्र दुसरीकडे चंद्रकांत पाटलांवर टीका करण्याचे त्यांनी टाळले. माझा चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे मेहता यांनी म्हटले आहे. भाजपाला बळकट करण्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
कोण आहेत वसिम रिझवी, जे इस्लाम सोडून हिंदू धर्माची आज दिक्षा घेणार? का वादात आहेत?
येत्या निवडणुकीत महाविकास आघाडी मोठे यश मिळवणार, गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला विश्वास
Girish Kuber: अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक किती करणार आहोत?; चंद्रकांत पाटलांचा सवाल