‘गायी कापणाऱ्या गायीचं मांस निर्यात करणाऱ्यांकडून भाजपने…’, संजय राऊत यांचा मोठा आरोप

| Updated on: Aug 03, 2024 | 1:55 PM

"केदारनाथच्या मंदिरातील सोनं गायब केलं. 500 किलो सोनं कुणी चोरलं? कुठे गेलं 500 किलो सोनं? हा प्रश्न हिंदू म्हणून विचारायला हवा. मोदी केदारनाथच्या गुंफेत जाऊन बसता. अयोध्येच्या रामाचे मालक झाला होता. आज रामाला गळक्या छपराखाली कोणी बसवलं?" असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

गायी कापणाऱ्या गायीचं मांस निर्यात करणाऱ्यांकडून भाजपने..., संजय राऊत यांचा मोठा आरोप
संजय राऊत
Follow us on

“आम्हाला मुस्लिमांनी मतदान केलं. पारशी समाजाने मतदान केलं, तसेच हिंदूंनी मतदान केलं. आकडे पाहा. तुम्हाला हिंदू मतासांठी रणनीती आखत आहात. मग 40 वर्ष काय झक मारत आहात का? शिवसेना सोबत नाही म्हणून तुम्हाला हिंदूची मते मागावी लागत आहेत. तुम्हाला हिंदूंची मते मिळणार नाहीत” असा दावा संजय राऊत यांनी केला.

“5 ऑगस्ट रोजी 370 कलम रद्द करण्याला पाच वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे तुम्ही काश्मीरमधील हिंदूंसाठी काय केलं याचं उत्तर द्या. तुम्ही हिंदू आहात. गाईचे भक्त आहात. आम्हीही आहोत. गायी कापणाऱ्या गायीचं मांस निर्यात करणाऱ्यांकडून भाजपने निधी का घेतला? तुम्हाला हिंदुत्ववादी म्हणण्याचा अधिकार काय?” असे प्रश्न भाजपाला विचारलेत.

आज रामाला गळक्या छपराखाली कोणी बसवलं?

“केदारनाथच्या मंदिरातील सोनं गायब केलं. 500 किलो सोनं कुणी चोरलं? कुठे गेलं 500 किलो सोनं? हा प्रश्न हिंदू म्हणून विचारायला हवा. मोदी केदारनाथच्या गुंफेत जाऊन बसता. अयोध्येच्या रामाचे मालक झाला होता. आज रामाला गळक्या छपराखाली कोणी बसवलं? उद्धवजींनी अयोध्येत जाऊन गळक्या छपरातील रामाला दुसरीकडे बसवण्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागेल. रामाला छत्री लावली आहे. गळक्या छपराखाली आहे. हे किती दिवस चालणार? पोटाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा आहे, सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या होत आहेत” असं संजय राऊत म्हणाले.