मंत्री शिवसेनेचा, मात्र नाराजी दूर करण्यासाठी भाजपची धडपड

| Updated on: Jul 05, 2019 | 4:21 PM

जालना : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री अर्जुन खोतकर यांची नाराजी दूर करण्यासाठी आता भाजपकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. अर्जुन खोतकरांच्या नाराजीचा जालना लोकसभा मतदारंसघात संभाव्य फटका लक्षात घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट भाजपचं शिष्टमंडळच अर्जुन खोतकरांच्या भेटीला पाठवलं. या शिष्टमंडळात सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि स्वत: रावसाहेब दानवे होते. एकंदरीत खोतकरांची नाराजी दूर करण्यासाठी […]

मंत्री शिवसेनेचा, मात्र नाराजी दूर करण्यासाठी भाजपची धडपड
Follow us on

जालना : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री अर्जुन खोतकर यांची नाराजी दूर करण्यासाठी आता भाजपकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. अर्जुन खोतकरांच्या नाराजीचा जालना लोकसभा मतदारंसघात संभाव्य फटका लक्षात घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट भाजपचं शिष्टमंडळच अर्जुन खोतकरांच्या भेटीला पाठवलं. या शिष्टमंडळात सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि स्वत: रावसाहेब दानवे होते. एकंदरीत खोतकरांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेऐवजी भाजपकडूनच अधिक धडपड होताना दिसते आहे.

शिष्टमंडळाच्या भेटीत काय झालं?

मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन सहकारमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष देशमुख हे रावसाहेब दानवेंना घेऊन जालन्यात अर्जुन खोतकरांच्या घरी दाखल झाले आणि त्यांनी खोतकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या बैठकीनंतर सुभाष देशमखांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले,”अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांची एकत्रित बैठक घेण्यास मला पक्षाने सांगितलं होतं. त्याप्रमाणे दोघांची बैठक घेतली. खूप सकारात्मक चर्चा झाली. पुढच्या काळात शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर हातात हात मिळवून, लोकसभा आणि विधानसभा ताकदीने लढून, जास्तीत जास्त उमेदवार जिंकण्याचं दोघांनीही ठरवलं आहे.”

अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे नेते आहेत. मात्र शिवसेनेकडून कमी आणि भाजपकडूनच अधिक धडपड होताना दिसते आहे. अर्थात, याचे कारण असे की, जालन्यातून रावसाहेब दानवे यांच्या रुपाने भाजपचा खासदार आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर यांच्यासारख्या जालन्यातील ताकदवाने नेत्याने बंडखोरी केल्यास भाजपला चांगलाच दणका बसेल. किंबहुना, दानवेंचा विजय मुश्किल होऊन बसेल. त्यामुळे खोतकरांची समजूत काढण्यासाठी थेट राज्याच्या प्रमुखांनी म्हणेच मुख्यमंत्र्यांनी हातपाय हलवायला सुरुवात केली आहे.

VIDEO : खोतकर-दानवे वादाचा लाईव्ह व्हिडीओ

अर्जुन खोतकर काय म्हणाले?

भाजपच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर अर्जुन खोतकर माध्यमांशी बोलताना म्हणाले, “उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील, तो निर्णय अंतिम आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे निर्णय घेतील.”. त्यामुळे अर्जुन खोतकर हे उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम मानणार आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी खोतकर मुंबईत ताटकळत राहिले होते. कारण उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट घेतली नव्हती.

खोतकरांच्या नाराजीचा भाजपला धसका, दानवेंसह सहकारमंत्री भेटीला

दरम्यानच्या काळात अर्जुन खोतकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याही भेटी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. खोतकरांच्या नाराजीचा फायदा घेत, काँग्रेस त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, स्वत: खोतकरांनी ठाकरे कुटुंबाशी गद्दारी करणार नसल्याचे सांगून या चर्चांना स्वल्पविराम दिला. मात्र, खोतकरांची नाराजी अद्याप दूर झाली नाही, हे स्पष्ट आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

जालन्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे विरुद्ध अर्जुन खोतकर यांच्यात वाद सुरु आहे. त्यातच अर्जुन खोतकर यांना पक्षात घेण्सासाठी काँग्रेसकडून चाचपणी सुरु आहे. नुसती चाचपणीच नव्हे, तर जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून अर्जुन खोतकर यांनाच उमेदवारी देण्यासाठीही हालचाली सुरु झाल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय, खोतकरांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची गेल्या काही दिवसात दोनदा भेट घेतल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

जालना जिल्ह्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा छत्तीसचा आकडा आहे. त्यातच महिन्या-दोन महिन्यांपासून अर्जुन खोतकर लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा आपणच पराभव करणार असल्याचे सांगत आहेत. किंबहुना, आपणच दानवेंविरोधात लाढणार असल्याचेही खोतकरांनी म्हटले होते. शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते, त्यामुळे खोतकरांच्या बोलण्याला महत्त्व आले होते. मात्र, ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी अमित शाहांच्या सोबत पत्रकार परिषद घेऊन शिवसेना-भाजप युतीची घोषणा केली आणि अर्जुन खोतकरांना घोषणांना धक्का बसला. मात्र, तरीही अर्जुन खोतकर मागे हटण्यास तयार नाहीत. दानवेंविरोधात लढण्यासाठी त्यांना शड्डू ठोकला आहे.