मुंबई : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा होती. त्यानंतर भाजपने महाराष्ट्रातील तिसरी यादी जाहीर केली. तिसऱ्या यादीत 6 जणांची नावं आहेत. नागपुरातून नितीन गडकरी, नगरमधून सुजय विखे पाटील अशा महत्त्वाचे उमेदवार भाजपच्या पहिल्या यादीत होते. तर दुसऱ्या यादीत पुण्यातून गिरीश बापट, बारामतीतून कांंचन कूल यांची नावं आहेत. भाजपच्या आधी काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या प्रत्येकी दोन याद्या जाहीर केल्या. काँग्रेसने आज तिसरी यादी जाहीर केली आहे. त्यामुळे कुठल्या उमेदवारासमोर कोण उमेदवार असेल, याचं चित्र थोडंफार स्पष्ट झालं आहे.
कुठल्या उमेदवाराला कुणाची टक्कर?
वाचा : Loksabha Election 2019 : भाजपची पहिली यादी जाहीर
लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. निवडणुकांसाठी आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. सर्वच पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. भाजपने महाराष्ट्रातील दुसरी तर काँग्रेसने तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे.
संबंधित बातम्या :
काँग्रेसची उमेदवार यादी, औरंगाबादमध्ये सुभाष झांबड, चंद्रपुरात मुत्तेमवारांना धक्का
बारामतीत सुप्रिया सुळेंना टक्कर देणाऱ्या कांचन कुल कोण आहेत ?
भाजपची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील सहा उमेदवारांची नावं घोषित
भाजपच्या पहिल्या यादीत दोन विद्यमान खासदारांना डच्चू
भाजपच्या पहिल्या यादीमुळे महाराष्ट्रातील दोन रोमहर्षक लढती निश्चित
पहिल्या यादीतून अडवाणींना डच्चू, गांधीनगरमधून ‘या’ बड्या नेत्याला संधी