भाजपची उलटी गिनती सुरू, ही तर ट्रायल मॅच; शिंदे-गुलाबरावांची टोलेबाजी

| Updated on: Dec 04, 2020 | 2:23 PM

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याने राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. (bjp's countdown-started in maharashtra says shashikant shinde)

भाजपची उलटी गिनती सुरू, ही तर ट्रायल मॅच; शिंदे-गुलाबरावांची टोलेबाजी
Follow us on

जळगाव: विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याने राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. या निवडणूक निकालामुळे महाविकास आघाडीची नव्हे तर भाजपची उलटी गिनती सुरू झाली आहे, असा टोला शशिकांत शिंदे यांनी लगावला आहे. तर ही तर ट्रायल मॅच आहे, असा चिमटा गुलाबराव पाटील यांनी काढला आहे. (bjp’s countdown-started in maharashtra says shashikant shinde)

पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड विजयी झाले आहेत. तर भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीची उलटी गिनती सुरू झाल्याचं भाजप म्हणत होतं. पण या निकालामुळे महाविकास आघाडीची नव्हे तर भाजपची उलटी गिनती सुरू झाल्याचं स्पष्ट झालं आहे, असं राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच राज्यपातळीवर आम्ही एकत्रित निवडणूक लढलो. त्यात आम्हाला घवघवीत यशही मिळाले आहे. विशेष म्हणजे भाजपच्या जागीही आम्ही विजयी झालो आहोत. या निवडणुकीचा निकाल म्हणजे सरकार चांगलं काम करत असल्याचा जनतेनेच दिलेला हा निर्वाळा आहे, असं सांगतानाच ही तर ट्रायल मॅच आहे, असं पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. धुळे-नंदूरबार येथे अमरीश पटेल यांचा झालेला विजय हा भाजचा विजय नाही. पटेल हे त्यांच्या कामामुळे निवडून आलेले आहेत, असंही ते म्हणाले. (bjp’s countdown-started in maharashtra says shashikant shinde)

राज्यातील सरकार तीन चाकी नाही, तर हे चारचाकी सरकार आहे. हे चौथं चाक जनतेचं आहे, असं त्यांनी सांगितलं. जो शेतकऱ्यांशी भिडतो त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. देशभरातील शेतकरी जंतरमंतरवर मंतर मारल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले.

टीमवर्कमुळे विजय: सुप्रिया सुळे

विधानपरिषदेच्या निवडणुकीतील यश ही मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती आहे, असा दावा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी सर्व मतदारांचे आभारही मानले आहेत. या यशासाठी अहोरात्र कष्ट करणारे कार्यकर्ते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी कष्ट घेतले. सर्वांच्या सुनियोजित अशा संघटीत प्रयत्नातून हा विजय साकारला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. (bjp’s countdown-started in maharashtra says shashikant shinde)

 

संबंधित बातम्या:

ये क्या हुआ? कैसे हुआ? कब हुआ? क्यों हुआ?, विरोधकांच्या गर्विष्ठ माना जनतेने वाकवल्या; अनिल देशमुखांची खोचक टीका

तीन पक्षांच्या आघाडीमुळे समीकरणं बदलली, ऑपरेशन लोटस बारगळणार?; भाजपची डोकेदुखी वाढली

आम्ही एक तरी जिंकलो, पण ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही : देवेंद्र फडणवीस

(bjp’s countdown-started in maharashtra says shashikant shinde)