कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आई सुनंदा पवार यांनी एक मोठ वक्तव्य केलं आहे. कुटुंब म्हणून आता एकत्र आलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सुनंदा पवार यांची प्रतिक्रिया स्वागतार्ह आहे. फक्त लेट झाला. काही महिन्यांपूर्वी ष्णमुखानंद सभागृहात मेळावा झाला, त्यावेळी अजितदादांनी हेच म्हटलं होतं. एकत्र आपण पुढे गेलं पाहिजे. आता त्यांची प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली 41 आमदार निवूडन आले आहेत. लोकसभेत एक खासदार, राज्यसभेत दोन खासदार आहेत” असं अमोल मिटकरी म्हणाले.
“अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढतोय. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमधला महत्त्वाचा पक्ष ठरला आहे. अशावेळेस देर आये, दुरुस्त आये. म्हणून त्यांना यायचं असेल तर ते येऊ शकतात. फक्त अजितदादांच नेतृत्व त्यांनी प्रामाणिकपणे मान्य करावं. राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र यावं, पक्षाचा सदस्य म्हणून हरकत नाही” असं अमोल मिटकरी म्हणाले. “माझा त्यांना एक प्रश्न आहे. मला विरोधी पक्षनेतेपद नको, संघटनेच पद द्या अशी मागणी अजितदादांनी केली होती. त्यावेळी हे मान्य केलं असतं, तर राष्ट्रवादीचे दोन गट झाले नसते. एकत्र आलं पाहिजे. पण संजय राऊत, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांना हे असं कधीच वाटणार नाही” असं अमोल मिटकरी म्हणाले.
‘देर आये, दुरुस्त आये’
सुनंदा पवार यांची प्रतिक्रिया स्वागतार्ह आहे, पण अंतिम निर्णय दादा घेतील असं अमोल मिटकरी म्हणाले. “अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली हा कौटुंबिक भाग होता. सर्व नेत्यांनी आशिर्वाद घेतले, त्यानंतर राजकीय अन्यवार्थ निघाले. संजय राऊतने नेहमीप्रमाणे खासदार फोडायला पाठवला असं म्हटलं. पण देर आये, दुरुस्त आये. राष्ट्रवादी काँग्रेसच नेतृत्व अजित पवारच करतील हे त्यांनी प्रामाणिकपणे मान्य करावं. त्यांच्या छत्रछायेखाली याव” असं मिटकरी म्हणाले.