सांगली : भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील बाणूरगड इथं बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा 19 जुलै रोजी पार पडला होता. त्यावेळी गर्दी जमवल्याप्रकरणी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case File against MLA Gopichand Padalkar for violating Disaster Management Act)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून बहिर्जी नाईक यांचं स्मारक साकारलं जात आहे. या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पार पडला. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन पद्धतीनं सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे निमंत्रक गोपीचंद पडळकर होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत अनेक हिरे होते. याच हिरकांच्या कोंदणातील एक हिरा म्हणजे बहिर्जी नाईक. बुद्धीचातुर्य, शौर्य, स्वामीनिष्ठा, प्रखर राष्ट्रप्रेम या गुणांचा अपूर्व संगम म्हणजे बहिर्जी नाईक’, अशा शब्दात फडणवीस यांनी बहिर्जी नाईक यांच्या शौर्याला नमन केलं होतं.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत अनेक हिरे होते. याच हिरकांच्या कोंदणातील एक हिरा म्हणजे बहिर्जी नाईक.
बुद्धीचातुर्य, शौर्य, स्वामीनिष्ठा, प्रखर राष्ट्रप्रेम या गुणांचा अपूर्व संगम म्हणजे बहिर्जी नाईक : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) July 19, 2021
“मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही”, अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूर दौऱ्यावर टीकास्त्र सोडलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: गाडी चालवत आषाढीच्या महापूजेसाठी पंढरपूरला गेले होते. त्यावरुन भाजप नेते दररोज टीका करत आहेत. आता गोपीचंद पडळकर यांनीही निशाणा साधला.
गोपीचंद पडळकर म्हणाले, “मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही. पण यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही. याच ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा महापालिका कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. जे आपल्या जीवाची पर्वा न करता पालिका कर्मचारी म्हणजे ‘कोविड वॅारीयर’ यांच्या सुरक्षा हमी अधिकारचं वाटोळं करायला हे ठाकरे सरकार निघालंय”.
केंद्र सरकारची प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना महापालिका कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारला फक्त अंमलात आणायची आहे. यासाठी लागणारा निधी हा केंद्राकडूनच आहे. मात्र तरीही सरकारनं याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलंय, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. पाच वेळा मा. उच्च न्यायालयाने तंबी देऊनसुद्धा ही योजना अंमलात आणण्यासाठी ठाकरे सरकार आपल्या जबाबदारीपासून टाळाटाळ करतंय. सामान्य गरीब जनता मेटाकुटीला आली असताना हे प्रस्थापितांचं सरकार गेंड्याची कातडी पांघरून बसलंय, अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकरांनी केली.
मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही. यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही.@BJP4Maharashtra @CMOMaharashtra #MahaVikasAghadi
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) July 21, 2021
इतर बातम्या :
Case File against MLA Gopichand Padalkar for violating Disaster Management Act