भर सभागृहात चंद्रकांतदादांनी अजितदादा आणि विखेंमधील घोळ दाखवला!

| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई : मराठा आरक्षणावरुन हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस चांगलाच गाजला. मात्र, मराठा आरक्षणाच्या चर्चेदरम्यान विरोधकांमध्ये काहीच ताळमेळ नसल्याचे समोर आले. मागासवर्ग आयोगाने तयार केलेला अहवाल सभागृहाच्या पटलावर मांडवा की नाही, यावरुन विरोधकांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनाही आयतं कोलित मिळालं. त्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते […]

भर सभागृहात चंद्रकांतदादांनी अजितदादा आणि विखेंमधील घोळ दाखवला!
Follow us on

मुंबई : मराठा आरक्षणावरुन हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस चांगलाच गाजला. मात्र, मराठा आरक्षणाच्या चर्चेदरम्यान विरोधकांमध्ये काहीच ताळमेळ नसल्याचे समोर आले. मागासवर्ग आयोगाने तयार केलेला अहवाल सभागृहाच्या पटलावर मांडवा की नाही, यावरुन विरोधकांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनाही आयतं कोलित मिळालं. त्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यातील घोळ भर सभागृहात दाखवून दिला.

मागासवर्ग आयोगाचा मराठा आरक्षणाबातचा अहवाल सभागृहाच्या पटलावर लवकरात लवकर सादर करा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तर दुसरीकडे जर अहवालामुळे घटनात्मक पेच निर्माण होत असेल किंवा अहवालाविरोधात कुणी कोर्टात गेलं, तर…? त्यापेक्षा अहवाल पटलावर सादर करु नका, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.

विखे पाटील आणि अजित पवार यांनी सभागृहात आपले मुद्दे मांडल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे मराठा आरक्षणावर निवेदन देण्यासाठी उभे राहिले. तेव्हा विरोधकांनी गदारोळ केला. मात्र, त्यावेळी सुरुवातीलाच चंद्रकांतदादांनी विखे पाटील आणि अजित पवार यांच्यातील घोळ सभागृहासमोर मांडला.

मगासवर्ग आयोगाचा मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सभागृहाच्या पटलावर मांडावा की नाही, याबाबत विखे पाटील आणि अजितदादांमध्ये अंतर आहे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांमधील मतांतरं समोर आणली.

“मराठा समाजाला आरक्षण मिळ नये म्हणून विरोधकांचा डाव”

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी विरोधकांचा डाव, असल्याचा गंभीर आरोप शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. तसेच, मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात मांडला तर त्याच्या विरोधात हायकोर्टात जाण्यासाठी वकील तयार असल्याचा आरोपही त्यांनी विरोधकांवर केला.