Chandrakant Khaire : खोके नागपूरवरून आले की दिल्लीवरून?, चंद्रकांत खैरेंचा सोमय्यांना सवाल
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेची सुपारी घेतली आहे का, सोमय्या उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काहीही बडबड करतो, असे वक्तव्य ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी कोरोना महामारीदरम्यान सगळा पैसा उद्धव ठाकरे यांच्या घरात गेल्याचा गंभीर आरोप केला. त्यावरून खैरे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. औरंगाबादमध्ये टीव्ही 9 शी बोलताना त्यांनी […]
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेची सुपारी घेतली आहे का, सोमय्या उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काहीही बडबड करतो, असे वक्तव्य ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी कोरोना महामारीदरम्यान सगळा पैसा उद्धव ठाकरे यांच्या घरात गेल्याचा गंभीर आरोप केला. त्यावरून खैरे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
औरंगाबादमध्ये टीव्ही 9 शी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी पैसे घेतले म्हणणारा किरीट सोमय्या मूर्ख आहे. मग हे एवढे खोके कोणी दिले, हे त्याला महिती आहे का? नागपूरवरून आले का दिल्लीवरून आले? त्याची माहिती काढावी, असा सल्लाही खैरे यांनी दिला. पुढे ते असेही म्हणाले की, शिवसैनिक हे भडकले आहेत. सोमय्या यांना वेळ आल्यावर आम्ही शिवसैनिक काय आहेत हे दाखवू, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला. विकासाबद्दल न बोलता शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना काहीही बोलतो. योग्य वेळ आली की किरीट सोमय्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ, त्याची जीभ पकडू आणि तोतऱ्या… तुझी बडबड सिद्ध करायला सांगू, असा इशाराही चंद्रकांत खैरे यांनी सोमय्यांना दिला.