मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना कोणत्या घडामोडी घडल्या याबाबत एका मुलाखतीदरम्यान माहिती दिली. तसेच या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापन करण्यासाठी विचारलं होतं, असंदेखील पवार यांनी सांगितलं. शरद पवार यांच्या या वक्तव्यांवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी तसेच शरद पवार यांना चांगलेच टोले लगावले आहेत. तुमचा इतिहास खरं न बोलण्याचा आहे. त्यामुळे तुम्ही जे बोलताय त्यावर विश्वास कोण ठेवणार ? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केलाय. ते माध्यमांशी बोलत होते.
“मोदी यांनी आपण एकत्र सरकार स्थापन करु असं सांगितलं होतं असे भाष्य शरद पवार यांनीक केले. तसेच अजित पवार यांनी शपथ का घेतली ? शरद पवार यांनी त्यांना पाठवले होतो का ? हे मला समजणार नाही. कारण मी एक छोटा कार्यकर्ता आहे. पण मी शरद पवार यांना एकच प्रश्न विचारेन की हे सांगायला तुम्हाला इतके महिने का लागले. तुमचा इतिहास खरं न बोलण्याचा आहे. त्यामुळे तुम्ही जे बोलताय त्यावर विश्वास कोण ठेवणार. मोदी यांनी ऑफर दिल्यावर तुमची धावत जाण्याची परंपरा आहे. त्यामुळे तुम्ही थांबलात का ? हा मोठा प्रश्न आहे,” असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना टोला लगावला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नितेश राणे यांच्या ठावठिकाण्याबाबत बोलताना त्यांच्या पत्ता सांगायला मी काय मुर्ख आहे का ? अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावत चौकशीला हजर राहण्याचे सांगितले होते. त्यावरदेखील चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. “राणे सर्वांना पुरून उरणार आहेत. नारायण राणे तसेच नितेश राणे यांच्या स्टेरमेंटवर ते कमेंट करत नव्हते. बराच काळ ते बोलण्याचे धाडस करत नव्हते. महाविकास आघाडी सरकार कृत्रिमरित्या आलेलं आहे. लोकांनी त्यांना कौल दिला नव्हता. विद्यापीठ सुधारणा कायदा ज्याप्रकारे समंत करुन घेतला तो नियमांना धरून नव्हता. नारायण राणे यांना नोटीस पाठवणं हा हस्यास्पद प्रकार आहे. पण शेवटी प्रत्येक विषयामध्ये अॅक्शन घेऊन तोंड फोडून घ्यायचं अशीच परंपरा सुरु झाली आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
इतर बातम्या :