पुणे : “काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी तसं म्हटलं नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने एक नवीन फेव्हीकॉल तयार केला आहे. चिकटवून ठेवलं तर काही केल्या तुटत नाही. त्यामुळे सकाळी भांडायचं आणि दुपारी गोड व्हायचं, असं चाललंय”, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला (Chandrakant Patil on Ashok Chavan statement).
काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केले होते. मात्र, नंतर त्यांनी तसं म्हटलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. याबाबत चंद्रकांत पाटील यांना पुण्यात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला (Chandrakant Patil on Ashok Chavan statement).
हेही वाचा : आघाडी सरकार म्हणजे फेव्हीकॉलचा जोड, कधीही काहीही होऊ शकतं : अब्दुल सत्तार
“महाविकास आघाडी सरकारला कुणाचा सल्ला लागत नाही. ते स्यंभू आहेत. त्यांनी एकदा मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस यांना विचारलं होतं. त्यावेळी फडणवीस बिहारला गेले होते. त्यांना बिहारमधून बोलवून घेतलं होतं. पण त्यानंतर किंवा त्या आधी कधीही काहीच विचारलं नाही. राज्य सरकारला कुणाचाही सल्ला नकोय. ते फक्त विरोधी पक्षाला सहभागी करुन घेतलं, याचं नाटक करतात”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
VIDEO : Chandrakant Patil | मविआने नवीन फेव्हीकॉल तयार केलाय – चंद्रकांत पाटील@ChDadaPatil pic.twitter.com/UYK1CcScTd
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 31, 2020
अशोक चव्हाण काय म्हणाले होते?
“काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. त्यामुळे नांदेडलाही निधी मिळाला नाही. मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला,” असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत दाखल झाले. यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले.
सत्तेत असताना आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, या मताचा मी आहे. पण दुर्दैवाने कोरोनामुळे 30 टक्केच निधी मिळाला, पण मराठवाड्याला अधिकचा निधी देण्याची माझी भूमिका असल्याची ग्वाही यावेळी अशोक चव्हाण यांनी दिली होती.
संबंधित बातम्या :
मी तसं बोललोच नाही, अशोक चव्हाणांचा ‘त्या’ विधानावरून यू-टर्न
महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षातील नेत्यांना निधी दिला जातो, त्यात कोणतीही काटकसर नाही : अब्दुल सत्तार