खासदार संभाजी छत्रपतींच्या राजीनाम्याने कोणावर परिणाम होणार?, सरकार कोडगं: चंद्रकात पाटील

| Updated on: Jun 01, 2021 | 1:23 PM

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजी छत्रपती यांनी राजीनामा दिल्यास त्याचा कोणावर परिणाम होणार आहे? हे सरकार कोडगं आहे. (chandrakant patil reaction on Sambhaji chhatrapati offers to resign)

खासदार संभाजी छत्रपतींच्या राजीनाम्याने कोणावर परिणाम होणार?, सरकार कोडगं: चंद्रकात पाटील
chandrakant patil
Follow us on

पुणे: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजी छत्रपती यांनी राजीनामा दिल्यास त्याचा कोणावर परिणाम होणार आहे? हे सरकार कोडगं आहे. त्यांना काही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. (chandrakant patil reaction on Sambhaji chhatrapati offers to resign )

चंद्रकांत पाटील हे मीडियाशी बोलत होते. संभाजीराजेंनी राजीनामा देऊन कोणावर परिणाम होणार आहे? महाराष्ट्रातील सरकार कोडगं आहे. त्यांना काही फरक पडणार नाही, असं पाटील म्हणाले. तसेच संभाजी छत्रपती यांची हेरगिरी सुरू असल्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला. संभाजी छत्रपती यांची हेरगिरी होत असेल तर ही गोष्ट निषेधार्ह आहे. या संदर्भात चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.

ती भेट राजकीय नव्हती

यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. पवार-फडणवीस यांची भेट राजकीय नव्हती. पवारांचं नुकतंच ऑपरेशन झालं आहे. त्यांची प्रकती बरी नव्हती. त्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी फडणवीस गेले. त्यात राजकीय काहीच नव्हतं, असं त्यांनी स्पष्ट केलं. सध्या फडणवीस हे जळगाव दौऱ्यावर आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे जळगावचंही मोठं नुकसान झालं आहे. त्याची पाहणी करण्यासाठी ते जळगावमध्ये असल्याचंही त्यांनी सांगितलं.

ओबीसी आरक्षणाशी केंद्राचा काय संबंध?

ओबीसीच्या आरक्षणाच्या निर्णयात केंद्राचा काय संबंध? या निर्णयाशी केंद्राचा काहीच संबंध नाही. राज्य सरकारने दीड वर्षापासून मागासवर्गीय आयोग नेमला नाही. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण गेलं. त्यामुळे सरकारने आधी मागासवर्गीय आयोग नेमावा आणि कोर्टाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं, असा टोलाही त्यांनी लगावला.

लांडगेंना समज देणार

भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी मुलीच्या लग्नात मिरवणूक काढून गर्दी जमवली. त्यामुळे लांडगे आणि भाजपवर टीका होत आहे. त्यावरही पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. लांडगे यांनी लग्नात मिरवणूक काढणे आणि गर्दी जमवणे चुकीचेच आहे. त्यांना पक्षाकडून समज दिली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. (chandrakant patil reaction on Sambhaji chhatrapati offers to resign )

 

संबंधित बातम्या:

ओबीसींच्या आरक्षणावरून फडणवीसांचा भुलभुलैय्या; छगन भुजबळांची टीका

देवेंद्र फडणवीसांच्या ‘सामना’तील मुलाखतीचा मुहूर्त लवकरच कळेल: संजय राऊत

Maharashtra News LIVE Update | अजित पवार यांच्या पदोन्नतीतल्या आरक्षणासंदर्भात बैठक सुरु, महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

(chandrakant patil reaction on Sambhaji chhatrapati offers to resign)