काँग्रेस पक्ष महाराष्ट्र,कर्नाटकचा असो वा इटलीचा विकासाचा शत्रूच, मराठ्यांबाबतही कपटी; चंद्रकांतदादांची टीका

| Updated on: Nov 18, 2020 | 5:22 PM

मराठ्यांबाबत काँग्रेसची भूमिका नेहमी कपटीच राहिली आहे, असं सांगतानाच काँग्रेस महाराष्ट्राचा असो वा कर्नाटकाचा किंवा इटलीचा नेहमीच विकासाचा शत्रू राहिला आहे, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. (chandrakant patil slams congress over Maratha board in karnataka)

काँग्रेस पक्ष महाराष्ट्र,कर्नाटकचा असो वा इटलीचा विकासाचा शत्रूच, मराठ्यांबाबतही कपटी; चंद्रकांतदादांची टीका
Follow us on

मुंबई: मराठा समाजाच्या मुद्द्यावरून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. मराठ्यांबाबत काँग्रेसची भूमिका नेहमी कपटीच राहिली आहे, असं सांगतानाच काँग्रेस महाराष्ट्राचा असो वा कर्नाटकाचा किंवा इटलीचा नेहमीच विकासाचा शत्रू राहिला आहे, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. (chandrakant patil slams congress over Maratha board in karnataka)

चंद्रकांत पाटील यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून ही टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये राहणाऱ्या मराठा बांधवांच्या हितासाठी, त्यांच्या विकासासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी एका महामंडळाची घोषणा केली असून त्यांच्यासाठी ५० कोटी रुपये केवळ जाहीर केले नाहीत तर त्यांचे वाटपदेखील केले आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी येडीयुरप्पा यांच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. कन्नड आणि मराठी लोकांमध्ये गेल्या काही काळापासून वाद सुरु असल्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी लोकांसाठी केलेले कोणतेही काम योग्य ठरणार नाही. यामुळे कन्नड लोकांच्या भावना दुखावल्या जातील, असं सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेस हा मराठ्यांबाबत नेहमीच कपटी राहिला असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

सुरुवातीपासूनच महाराष्ट्रात देखील काँग्रेसचा मराठ्यांबद्दल असाच स्वभाव पाहायला मिळाला आहे. आधी या सरकारने काही ना काही घोळ करून मराठा आरक्षणात अडचणी निर्माण केल्या आहेत. त्यानंतर ‘सारथी’ला नुकसान पोहोचवून अण्णासाहेब पाटील महामंडळसुद्धा बरखास्त करून टाकले आहे. काँग्रेस पक्ष भले ही महाराष्ट्राचा असो किंवा कर्नाटकचा, दिल्लीचा असो वा इटलीचा… सर्वच भारत आणि भारतीयांच्या विकासाचा शत्रू आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते आता सिद्धरामय्या यांच्या या वक्तव्याबद्दल अगदी चिडीचूप मुक्या-बहिऱ्यासारखे पाहत राहतील. काँग्रेसवाल्यांनी कधीच मराठा समाजाच्या हिताचा विचार केला नाही. त्यांनी मराठा समाजासाठी काहीही चांगली गोष्ट केली नाही, असं सांगतानाच सत्तेची लाचारी… काँग्रेस विचारांनीसुद्धा भ्रष्टाचारी, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

 

संबंधित बातम्या:

सिद्धरामय्यांचं महिलेशी गैरवर्तन, माईक हिसकावताना पदर हाती

आम्ही विधान परिषदेच्या सहाच्या सहा जागा जिंकणार, कुणी पलायन केलं तरी पक्षाला फरक पडत नाही : चंद्रकांत पाटील

स्वत:च्या बळावर सरकार चालवता येत नसेल तर जोडतोड करून सत्ता आणलीच कशाला?; चंद्रकांतदादांचा सवाल

(chandrakant patil slams congress over Maratha board in karnataka)