मुंबई : “मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अपॉईंटन्मेट हवी आहे (Chandrakant Patil want appointment of CM Uddhav Thackeray). मला त्यांची अपॉईंटन्मेट मिळवून द्या. मुख्यमंत्री त्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानातून बाहेर पडायलाच तयार नाहीत. विरोधीपक्ष नेत्यांची बैठकसुद्धा ते मातोश्रीत बसूनच घेतात”, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. चंद्रकांत पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला (Chandrakant Patil want appointment of CM Uddhav Thackeray).
“मुख्यमंत्र्यांनी हवंतर एक नवीन पीपीई किट तयार करावं. एक, दोन किंवा पाच हजारवालं पीपीई किट घ्यावं. दिवसातून चारवेळा बदलावं, पण रुग्णालयांमध्ये फिरावं”, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला.
“केईएम रुग्णालयाच्या एका डॉक्टरचं व्हाट्सअॅपला आलं होतं. केईएम हॉस्पिटलला वॉर्ड बॉय नाहीत. डॉक्टरच रुग्णाला टॉयलेटला घेऊन जातात. एक रुग्ण तर टॉयलेटमध्येच पडला. त्याला तसंच उचलावं लागलं. विशेष म्हणजे केईएम हॉस्पिटलची अशी परिस्थिती आहे”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
“मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर बुक केलं पाहिजे. नागपूरला गेलं पाहिजे. मालेगावला जावून पोलिसांसोबत बैठक घेतली पाहिजे. पोलिसांचा उत्साह वाढवायला पाहिजे. हे केलं का आमच्या मुख्यमंत्र्यांनी?”, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
“केंद्र सरकारने स्थलांतरित मजुरांच्या निवारासाठी राज्य सरकारला 1600 कोटींचा निधी दिला. पण राज्य सरकारकडून स्थलांतरितांची योग्य व्यवस्था केली गेला नाही. स्थलांतरितांना राज्यात थांबवण्यात सरकारला यश आलं नाही”, अशी टीका त्यांनी केली.
“कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे? पुण्यात यंत्रणेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने सर्व्हे केला. त्यांनी जवळपास 3 हजार लोकांची वैद्यकीय तपासणी केली. यापैकी 300 संशयित होते. त्या सर्वांची महापालिकेच्या रुग्णालयात तपासणी केली. यापैकी 30 रुग्ण बाधित आढळले. पुण्याच्या झोपडपट्टी परिसरात सर्वांची तपासणी करण्यात आली. तशीच तपासणी तुम्ही मुंबईत का नाही करत?”, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला केला.
“पुणे महापालिका भाजपच्या ताब्यात तर मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात असा काही मुद्दा नाही. हे संकंट खूप मोठं आहे. पुण्यामध्ये बरं होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. याशिवाय जे रुग्ण आहेत त्यापैकी 90 टक्के रुग्णांमध्ये फारसे लक्षणं नाहीत. दहा ते बारा दिवसांमध्ये कदाचित त्यांनादेखीस डिस्चार्ज मिळेल किंवा हा आकडा आहे तोच राहील”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“मला मुंबई आणि पुण्यात तुलना करायची नाही. मुंबईत झोपडपट्टी परिसर जास्त आहे. आठ बाय दहाच्या खोलीत पाच ते सहा लोकं राहतात. याशिवाय हा आजार 60 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना लवकर होतो. त्यामुळे रांगेत त्यांना क्वारंटाईन करा. क्वारंटाईन केंद्रात चांगली व्यवस्था करा”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“क्वारंटाईन सेंटरमध्ये चांगली व्यवस्था नाही. 5 रुपयात शिवभोजन म्हणता मग 50 रुपयात खिचडी? ती खिचडी दुपारी अडीच वाजता येते, आंबलेली असते. एवढं असूनही आम्ही बोलायचं नाही?”, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.
“रोज हजार ते बाराशे रुग्ण आढळत आहेत. हे रुग्ण ते कुठे ठेवत आहेत. याशिवाय वानखेडे घ्यावं की नाही यावरुन आपापसात भांडत आहेत. एक म्हणतो वानखडे घ्या तर एक म्हतो पाऊस येईल. पाऊस येईल हा काय नवीन शोध लावला का?”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
भाजपचं मेरा आंगण ते रणांगण धोरण
“महाराष्ट्रातील सामान्य माणसालाही काही म्हणायचं आहे. त्या सगळ्यांना विनंती केली आहे की, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून आपल्या घराच्या अंगणात आपण बोर्ड घेऊन उभं राहायचं आहे. मेरा आंगण ते रणांगण असं आमचं धोरण असेल”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
‘केरळमध्ये 600 रुग्ण तर महाराष्ट्रात 33 हजार रुग्ण’
“महाराष्ट्रात पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडून जवळपास 55 ते 60 दिवस होत आले आहेत. या सगळ्या संकंट काळात भाजपकडून 1 कोटी लोकांना दोन वेळचं ताजं जेवण वाटप करुन सहकार्य केलं गेलं. दुसरीकडे केरळमध्ये आतापर्यंत 600 रुग्ण आढळले आहेत. मात्र, महाराष्ट्रात तब्बल 33 हजारच्या जवळपास रुग्ण आढळले आहेत. यानंतरही जर आम्ही बोललो नाहीत तर लोकं आम्हाला विचारतील. विरोधी पक्ष म्हणून तुमची भूमिका काय? असा प्रश्न लोक करतील. या संकंटकाळात असं काही बोलायला नको असं म्हणणारी लोकंदेखील विचारतील”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“रुग्ण आढळणं हे आपल्या हातात नसतं. मात्र, योग्य व्यवस्था करणं सरकारच्या हातात असतं. केरळमध्ये जवळपास दीड लाख लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. परिणामी, केरळमधील रुग्णांची संख्या 600 वर पोहोचली आहे. याशिवाय मृतांची संख्या 4 इतकी आहे. आपल्या महाराष्ट्रात मृतांची संख्या तेराशच्या पुढे गेली आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
‘गुजरात आणि मध्यप्रदेशात असुविधा असल्यास विरोधी पक्षांना बोलण्याचा अधिकार’
“गुजरात आणि मध्यप्रदेशात देखील रुग्णांची संख्या वाढत आहे. तिथे असुविधा असेल तर त्या राज्यांच्या विरोधीपक्षांना त्यावर बोलण्याचा अधिकार आहे. आम्ही महाराष्ट्रापुरता बोलतोय. महाराष्ट्रामध्ये चांगली आरोग्य सुविधा नाही. सामान्य माणसाला सरकारकडून कुठलंही वेगळं पॅकेज मिळालेलं नाही”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
संबंधित बातम्या :
उद्धव ठाकरेंना कॉंग्रेस-राष्ट्रवादी उद्ध्वस्त करेल, महाविकास आघाडी तोडण्याची हीच ती वेळ : स्वामी
मेरा आंगण, मेरा रणांगण, चंद्रकांत पाटलांचा नारा, भाजपचं 22 तारखेला ठाकरे सरकारविरोधात आंदोलन