उद्धव ठाकरे यांनी संताजी-धनाजी सारखा शिंदे-फडणवीसांचा धसका घेतलाय; बावनकुळे यांचा हल्लाबोल सुरूच

| Updated on: Oct 16, 2022 | 1:27 PM

राज ठाकरे यांची भेट राजकीय समजू नये. मुंबईच्या विकासासाठी किंवा अन्य काही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ते भेटले असतील. त्यांच्या प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ लावू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

उद्धव ठाकरे यांनी संताजी-धनाजी सारखा शिंदे-फडणवीसांचा धसका घेतलाय; बावनकुळे यांचा हल्लाबोल सुरूच
उद्धव ठाकरे यांनी संताजी-धनाजी सारखा शिंदे-फडणवीसांचा धसका घेतलाय; बावनकुळे यांचा हल्लाबोल सुरूच
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सुनील ढगे, टीव्ही9 प्रतिनिधी, नागपूर: उद्धव ठाकरेंची (uddhav thackeray) कॅसेट जुनी झाली. त्यामुळे ते दुसरं काही बोलत नाहीत. त्यांच्याकडे दुसरी कॅसेट नाही. म्हणून शिंदे शिंदे शिंदे सुरू आहे. मोगलांना संताजी धनाजी जसे पाण्यात दिसत होते तसे आता उद्धव ठाकरेंना फडणवीस-शिंदे दिसतात. खिडकीत बघतात तेव्हा त्यांना शिंदे-फडणवीस दिसतात. जेवायला बसतात तेव्हा शिंदे-फडणवीस दिसतात. कार्यकर्त्यांशी संबोधित करताना शिंदे-फडणवीस दिसतात. संताजी-धनाजी सारखा त्यांनी शिंदे-फडणवीसांचा धसका घेतला आहे, अशी टीका भाजपचे (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ही टीका केली. कोर्टाने गुन्हेगार ठरवल्यावर एखादी व्यक्ती आरोपी ठरते. कोर्ट निकाल देत नाही तोपर्यंत कोणतीही व्यक्ती गुन्हेगार नसते. तोपर्यंत त्याला गुन्हेगार मानता येत नाही. त्या आधीच गुन्हेगार ठरवून उमेदवारी नाकारणं चुकीचं आहे, असं सांगतानाच पराभवाची भीती असल्यानेच मुरजी पटेल यांच्यावर आरोप केला जात आहे. मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेणं हे षडयंत्र आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकार फेसबुकवर चालवलं. ते कधीच मंत्रालयात आले नाही. मंत्री निरुपयोगी होते. ते काय सांगणार. उद्धव ठाकरेंना मतं म्हणजे काँग्रेसला मतं देणं आहे. उद्धव ठाकरेंना मत देणं म्हणजे राष्ट्रवादीला मतं देणं आहे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

यावेळी त्यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 21व्या शतकातील सर्वमान्य नेते आहेत. जगातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे काही लोकांची पोटदुखी होत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर मोदींवर टीका करत आहेत, असं ते म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांनी कुणासोबत जायचं आणि नाही जायचं हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. ज्यांनी अडीच वर्षात काहीच विकास केला नाही. त्यांच्यासोबत आंबेडकर जाणार आहेत का याचा विचार त्यांनी केला पाहिजे, असंही ते म्हणाले.

राज ठाकरे यांची भेट राजकीय समजू नये. मुंबईच्या विकासासाठी किंवा अन्य काही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ते भेटले असतील. त्यांच्या प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ लावू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.