साहेब, तुम्हीच आमचे विठ्ठल, बडव्यांना बाजूला करा; छगन भुजबळ यांचा भाषणातील तो बडवा कोण?

| Updated on: Jul 05, 2023 | 1:41 PM

नागालँडमध्ये भाजपला आपण साथ दिली. तिथल्या राष्ट्रवादीच्या आमदारांचा सत्कार केला. मग आम्ही वेगळी भूमिका घेतली तर चुकीचं काय? आपण शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत का नाही?

साहेब, तुम्हीच आमचे विठ्ठल, बडव्यांना बाजूला करा; छगन भुजबळ यांचा भाषणातील तो बडवा कोण?
Chhagan bhujbal
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच काही सवाल केले आहेत. शरद पवार आमचे विठ्ठल आहेत. पण त्यांना पक्षातील काही बडव्यांनी घेरलं आहे. साहेब, या बडव्यांना दूर करा. आम्हाला आवाज द्या. आम्ही तुमच्यासोबत येतो. आपण सरकारमध्ये राहून महाराष्ट्राच्या विकासाचं काम करू, असं आवाहनच छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना केलं. तसेच पवार यांना बडव्यांनी घेरल्याचं सांगत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे पवारांना घेरणारे ते बडवे कोण? असा सवाल केला जात आहे.

साहेब, तुमच्याबद्दल आदर आहे. तुम्हाला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. वसंतदादांनाही वाईट वाटलं असेल. मी तुमच्याकडे आलो. तेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि माँ साहेबांना असंच वाईट वाटलं होतं. धनंजय मुंडेंना तुम्ही पक्षात घेतलं, तेव्हा काका असलेले गोपीनाथ मुंडे आणि बहीण असलेली पंकजा यांच्या डोळ्यातही असेच अश्रू आले होते. साहेब काहीच बिघडलेलं नाही. आमच्यावर केसेस आहेत म्हणून गेलो नाही. तुमच्याभोवती बडवे आहेत म्हणून गेलो. तुम्ही आवाज द्या बडव्यांना बाजूला करा आम्ही एकत्र यायला तयार आहोत, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं.

हे सुद्धा वाचा

आम्हाला आशीर्वाद द्या

नागालँडमध्ये आमदारांना भाजपसोबत जायला परवानगी दिली. आम्हालाही सोबत घ्या. त्यांना सोबत घेतलं आम्हाला पोटाशी धरा. साहेब, आमचाही सत्कार करा ना, नागालँडच्या आमदारांना सत्कार केला तसं आम्हालाही पोटाशी धरा. विचारधारा कायम राहिली पाहिजे. राजकारणात धरसोड वृत्ती चालणार नाही, असं सांगतानाच साहेब आमचे विठ्ठल आहेत. त्यांना बडव्यांनी घेरलं आहे. साहेब बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला या, असं आवाहन त्यांनी केलं.

तर राष्ट्रवादी नंबर वन पक्ष झाला असता

शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष होते. मी महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. तीन महिने झाल्यावर अचानक इंडिया शायनिंग सुरू झालं. लोकसभा निवडणुकीपूर्वी सहा महिने आधी विधानसभेची निवडणूक घेतली. आम्हाला प्रचाराला वेळही मिळाला नाही. वेळ मिळाला असता तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष झाला असता. वेळ मिळाला नाही. काँग्रेसबरोबर समझोता झाला. काँग्रेसचा मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री झाला. एक महिन्याच्या आत मी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. कारण मी उपमुख्यमंत्री झालो होतो, असंही त्यांनी सांगितलं.