मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यांनी उदयनराजेंना ‘बिनडोक राजा’ म्हणून संबोधलं होतं. त्यावर आता छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजेंबाबतचं आंबेडकरांचं वक्तव्य पटलं नाही, असं म्हणत संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली आहे (Chhatrapati Sambhajiraje Reaction On Prakash Ambedkars Statement).
“प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहेत. शाहू महाराज आणि बाबासाहेब यांचे चांगले संबंध होते. आमच्या बंधुंवर वक्तव्य करणे मला पसंत पडले नाही, त्यांनी तसे वक्तव्य करु नये, माझ्याबद्दल ते काही बोलले असतील तर ती लोकशाही आहे”, असं मत संभाजीराजेंनी प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर व्यक्त केलं.
प्रकाश आंबेडकरांचा उदयनराजे-संभाजीराजेंवर घणाघात
मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर करताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सडकून टीका केली होती. “एक राजा तर बिनडोक आहे, आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा असं म्हणतात’ अशा शब्दात प्रकाश आंबेडकर उदयनराजेंवर बरसले. तर संभाजीराजे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
‘एक राजा तर बिनडोक आहे. असं मी म्हणेन, दुसरे संभाजीराजे आहेत, त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत आहेत, असं मला दिसतंय’ असं प्रकाश आंबेडकर म्हणाले (Chhatrapati Sambhajiraje Reaction On Prakash Ambedkars Statement).
तुम्ही उदयनराजेंना अंगावर घेताय का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ‘मी अंगावर घ्यायला कोणालाच भ्यायलेलो नाही. ज्या माणसाला घटना माहिती नाही. आम्हाला आरक्षण मिळालं नाही, तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा, असं ते म्हणतात. भाजपने यांना राज्यसभेवर कसं पाठवलं तेच कळत नाही’ असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी आश्चर्य व्यक्त केलं.
एक राजा बिनडोक, तर दुसऱ्यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर, प्रकाश आंबेडकरांचा उदयनराजे-संभाजीराजेंवर घणाघात https://t.co/VbNX7a8p5r @Prksh_Ambedkar @Chh_Udayanraje @YuvrajSambhaji
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 8, 2020
Chhatrapati Sambhajiraje Reaction On Prakash Ambedkars Statement
संबंधित बातम्या :
MPSC परीक्षा रद्द होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार; संभाजीराजेंचा इशारा