नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती एन व्ही रमणा (CJI N V Ramana)हे शुक्रवारी रिटायर (retired)झाले. आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या दोन दिवसांत त्यांनी महत्त्वाच्या प्रकरणांची (important cases)सुनावणी केली. सेरेमोनियल बेंचमध्ये त्यांच्या निरोप समारंभात अटर्नी जनरल केके वेणूगोपाल म्हणाले की, रमणा यांच्या निवृत्तीमुळे आम्ही एक बुद्धिजीवी आणि एक उत्कृष्ट न्यायाधीश गमावला आहे. तर वरिष्ठ वकील दुष्य़ंत दवे यांनी कोर्टातच रडण्यास सुरुवात केली. तेो म्हणाले की, रमणा हे जनतेचे न्यायाधीश आहेत. सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले की मुख्य न्यायमूर्तींचे सेरेमोनियल बेंचमधून लाईव्ह स्ट्रिमिंग झाले. ज्याचे सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर वेबकास्ट करण्यात आले.
एन व्ही रमणा 16 खंडपीठातील सुनावणीसाठी मास्टर ऑफ रोस्टर केस डिस्ट्रीब्युट करीत होते. मात्र गेल्या काही दिवसांत खटल्यांचे लिस्टिंग होत असताना, सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीसमोर ते हतप्रभ असल्याचे दिसून आले. 17 ऑगस्ट रोजी सुनावणीसाठी असलेली एक लिस्टेड केस रजिस्ट्रीने हटवली होती. त्यावर रमणा चांगलेच नाराज झाले होते. त्यावर निवृत्तीच्या भाषणात बोलेन असे ते म्हणाले होते. मात्र अखेरच्या भाषणात त्यांनी पेंडन्सी (खटल्यांची संख्या) हे सर्वात मोठ आव्हान असल्याचे सांगितले आहे. तसेच लिस्टिंगमध्ये जास्त लक्ष देऊ शकलो नाही, असेही त्यांनी सांगितले. व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि आर्टिफिशियल एंटिलिजेन्स तैनात करण्याची आवश्यकता आहे. मात्र हे बाजारातून खरेदी करता येणार नाही असेही रमणा यांनी स्पष्ट केले. रमणा म्हणाले की असे अनेक मुद्दे आहेत, ज्यावर ते प्रश्न उपस्थित करु इच्छितात. मात्र पद सोडण्यापूर्वी त्यावर बोलणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.