मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक मोठी घोषणा केलीयं. नगर परिषदेच्या निवडणुका आता थेट होणार आहेत. ग्रामपंचायतीचे सरपंच थेट निवडून येतील. बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदान (voting) करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. 2020 ला तो रद्द केला होता. मात्र, आता मुख्यमंत्र्याच्या घोषणेप्रमाणे नगराध्यक्ष आणि सरपंच थेट लोकांमधून निवडले जाणार आहेत. इतकेच नाही तर बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार (Rights) मिळणार आहे.
नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडले जाणार आहेत. बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याची मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलीयं. आणीबाणीच्या काळात ज्या लोकांना तुरुंगात राहावं लागलं होतं. अनेक राज्यात पेन्शन दिली जात होती. त्यांना पेशन्शन देण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही हा निर्णय घेतला होता. पण मागच्या सरकारने तो रद्द केला होता. आम्ही हा निर्णय घेतला आहे. 3600 लोकांना लाभ मिळणार. 1800 अर्ज आले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
आजच्या बैठकीमध्ये पेट्रोलच्या दरात 5 तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची कपात करून मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देखील दिलायं. अगोदर नगराध्यक्ष आणि सरपंच थेट लोकांमधून निवडले जात नव्हते. निवडून आलेले सदस्य संख्याबळानुसार सरपंच आणि नगराध्यक्षाची निवड होत होती. मात्र, आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर सरपंच आणि नगराध्यक्षांना लोकांमधूनच निवडून यावे लागणार आहे.