‘उत्तानपणे नंगटपणा करणाऱ्या या बाईला रोखण्यासाठी पोलिसांकडे कायदे आहेत की नाही?’; चित्रा वाघ यांच्याकडून ऊर्फीच्या अटकेची मागणी

| Updated on: Dec 31, 2022 | 2:55 PM

'शी…ऽऽऽऽ अरे..हे काय चाललयं मुंबईत...', चित्रा वाघ उर्फीवर भडकल्या

उत्तानपणे नंगटपणा करणाऱ्या या बाईला रोखण्यासाठी पोलिसांकडे कायदे आहेत की नाही?; चित्रा वाघ यांच्याकडून ऊर्फीच्या अटकेची मागणी
'उत्तानपणे नंगटपणा करणाऱ्या या बाईला रोखण्यासाठी पोलिसांकडे कायदे आहेत की नाही?'; चित्रा वाघ यांच्याकडून ऊर्फीच्या अटकेची मागणी
Follow us on

Chitra Kishor Wagh on urfi javed : ‘बिग बॉस ओटीटी’ फेम अभिनेत्री उर्फी जावेद (urfi javed) कायम तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे देखील चर्चेत असते. विचित्र कपडे घालून सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणाऱ्या उर्फीचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. विचित्र ड्रेसिंग स्टाईलमुळे अभिनेत्री अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली आहे. एवढंच नाही, तर विचित्र कपडे घालून सर्वत्र फिरत असल्यामुळे उर्फीला अटक करण्याची मागणी देखील अनेकांनी केली. आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Kishor Wagh) यांनी देखील उर्फीवर संताप व्यक्त केला आहे.

ट्विट करत चित्रा वाघ यांनी उर्फीला अटक करण्याची मागणी केली आहे. ट्विट करत त्या म्हणाल्या, ‘शी… अरे..हे काय चाललयं मुंबईत…उत्तानपणे नंगटपणा करणाऱ्या या बाईला रोखण्यासाठी पोलिसांकडे कायदे आहेत की नाही?’ असा प्रश्न देखील चित्रा वाघ यांनी ट्विट करत उपस्थित केला.

चित्रा वाघ उर्फीवर भडकल्या

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, ‘तात्काळ बेड्या ठोका हीला एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये….’ असं म्हणत चित्रा वाघ यांनी उर्फीवर संताप व्यक्त केला.

दरम्यान, उर्फी जावेद कायम विचित्र कपडे घालून सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेते. उर्फीच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे तिला अनेकदा ट्रोल देखील करण्यात आलं. पण अभिनेत्री कायम ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करून ती तिचा लूक कायम ठेवते.