मुंबई (गिरीश गायकवाड) : महाराष्ट्र विधिमंडळाच्या आवारात आज एक अप्रिय घटना घडल्याची चर्चा आहे. ज्या विधिमंडळात कायदे बनवले जातात, ज्यांच्याकडून जनतेला सभ्य कारभाराची अपेक्षा असते, त्याच विधिमंडळाच्या लॉबीमध्ये आज दुपारी दोन आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याच वृत्त आहे. महत्त्वाच म्हणजे सत्ताधारी एकनाथ शिंदे गटाचे हे दोन आमदार आहेत. एकनाथ शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याच वृत्त आहे. नाशिक जिल्ह्यातून येणारे मंत्री दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीमध्ये धक्काबुक्की झाली. नेमक या वादामागे काय कारण आहे? ते अजून स्पष्ट झालेलं नाही. दादा भुसे यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलताना दिसले.
महेंद्र थोरवे हे कर्जतचे आमदार आहेत. दोनवर्षापूर्वी शिवसेनेत बंड झालं, तेव्हापासून हे आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात वाद इतका वाढला की, भरतशेठ गोगावले आणि आमदार शंभुराजे देसाई यांना मध्यस्थी करावी लागली असं बोलल जातय.
शिंदे गटाचे दुसरे आमदार संतोष बांगर याबद्दल काय म्हणाले?
याबद्दल शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्याशी टीव्ही 9 मराठीने संवाद साधला. “अशी कुठलीही धक्काबुक्की झालेली नाही. अस काही घडलेलं नाही. आम्ही तिघांनी एकत्र चहा घेतला” असं संतोष बांगर यांनी सांगितलं. “महाराष्ट्राला महान नेत्यांची परंपरा आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात चांगले नेते होते, पण असं कधी घडल नव्हतं” असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. सध्या विधिमंडळाच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यासाठी सर्वच पक्षाचे आमदार विधान भवनात उपस्थित असतात.
प्रताप सरनाईक काय म्हणाले?
“महेंद्र थोरवे यांच्या मतदार संघातील एमएसआरडीसीचं काम होतं, ते काम पूर्ण करण्यासाठी दोन्ही नेते एकमेकांशी बोलत होते, आत्ता विषय असा झालाय की यात मुख्यमंत्र्यांनी यामध्ये मध्यस्थी केलीय. मुख्यमंत्री बैठक घेतील, दोघांना समज देतील. धक्काबुक्की झालेली नाही. दोन्ही नेते एकमेकांशी बोलत होते. विधान भवनात कसे कुणी धक्काबुक्की करेल” असं प्रताप सरनाईक म्हणाले.