मुंबई : गेल्या एक महिना पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतली. तर त्याचवेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकानाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्ली जात दिल्लीतल्या बड्या भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यामध्ये पंतप्रधान मोदी तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह अशा मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठीचा समावेश होता. या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी सुरूच आहेत. त्यांनी आजच सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांची भेट घेतली आहे. भाजप सरकारच्या काळात आरएसएसचा रोल हा अत्यंत महत्वाचा राहिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवत यांच्या काय चर्चा झाली? याची उत्सुकता राज्याच्या राजकारणाला लागली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक @DrMohanBhagwat यांची त्यांच्या दादर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री मा.श्री.@Dev_Fadnavis उपस्थित होते. यासमयी माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीसाठी डॉ.मोहन भागवत यांनी अनेक आशीर्वाद देऊन मौलिक मार्गदर्शन केले. pic.twitter.com/87TlLYQ37n
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 1, 2022
या भेटीचे काही खास फोटोही समोर आले आहेत. तर या भेटीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मोहन भागवत यांच्यासोबतची भेट एक सदिच्छा भेट होती. या भेटीसाठी मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो. एका कार्यक्रमातून आम्ही तिथे एकत्र आलो. आणि आमची भेट झाली. मोहन भागवत साहेब आमच्यासाठी आदरणीय आहेत. त्यामुळे मी त्यांना ठाण्यालाही भेटलो. नव्या सरकारसाठी त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद घेतले. त्यांची ही भूमिका बाळासाहेबांच्या विचाराचीच आहे. अशी प्रतिक्रिया या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
तरी या भेटीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही भेट शंभर टक्के हिंदुत्वाचा मुद्दा तर आहेच. यावेळी सरसंघचालकांनी सांगितले की चांगले काम करा. एकमेकांना सोबत घेऊन राज्याचे राजकारण पुढे न्या. तसेच मुख्यमंत्र्यांना सरसंघचालकांची भेट घ्यायची होती. त्यामुळे ही भेट घेतली. त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली, अशी माहिती या भेटीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
गेल्या अडीच वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली. मात्र अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांना मोठा धक्का देत हिंदुत्वाचा मुद्दा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेपासून दूर चाललो आहोत, अशी कारणं देत 50 आमदारासह बंड करत ठाकरे सरकार कोसळाला भाग पाडलं आणि त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यामुळेच या भेटीगाठींना विशेष महत्व आहे.