समृद्धी महामार्गासाठी प्रसंगी मी माझा जीवही धोक्यात घातला-एकनाथ शिंदे

| Updated on: Dec 10, 2022 | 10:34 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची Exclusive मुलाखत...

समृद्धी महामार्गासाठी प्रसंगी मी माझा जीवही धोक्यात घातला-एकनाथ शिंदे
Follow us on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं (Samruddhi Mahamarg) उद्या लोकार्पण होणार आहे. या महामार्गाशी संबंधित विविध मुद्द्यांवर tv9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde Exclusive Interview) यांच्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गासाठी प्रसंगी मी जीव धोक्यात घातला, असं म्हटलं.

जमीनी द्यायला शेतकऱ्यांचा विरोध होता. त्यांना जमीनी द्यायला तयार करावं लागत होतं. काही ठिकाणी मुद्दाम विरोध करायला भाग पाडलं जात होतं. तेव्हा मी स्वत: बुलढाण्याला गेलो होतो. त्यांचा समज मी दूर केला. त्यांना फायदा दाखवून दिला. त्यांच्या जमीनीचा योग्य मोबदला देण्याचं वचन दिलं. लोकांना विश्वास नव्हता की त्यांना योग्य दाम मिळेल की नाही याचा पण मी त्यांना खात्री दिली. कागदावर सही करून दिली. तेव्हा हे लोक आपली जमीन द्यायला तयार झाले, अशी आठवण शिंदेंनी सांगितली.

बुलढाण्याच्या लोकांचं मन परिवर्तन केल्यानंतर आम्ही तिथून निघालो. पायलटकडून विमान ढगात गेलं. तेव्हाचा तो प्रवास अतिशय अडचणीचा होता. तो थरारक प्रवास अजही आठवतो, असं शिंदेंनी सांगितलं.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या संपूर्ण मुलाखतीची लिंक

समृद्धी महामार्गामुळे स्थानिकांचा फायदा

समृद्धी महामार्गासाठी तुम्ही जमीन दिल्यास यातून मिळणाऱ्या पैशातून तुम्ही आणखी यापेक्षा जास्त जमीन घेऊ शकता. नवा व्यावसाय करू शकता. त्यांना विश्वास दिला. त्याच्या जमीनीचा मोबदला मिळेल म्हणून. लोकांच्या घराचा गोठ्याचा, विहीरीचा सगळ्याचा मोबदला त्यांना दिला. त्यामुळे लोकांनी एकत्र येत या महामार्गासाठी आपली जमीन दिली, असं शिंदे यांनी यावेळी सांगतलं.