“भाजपासोबत आमची वैचारिक युती होती. प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्या प्रयत्नातून युती झालेली. उद्धव ठाकरेंनी जी चूक केली, ती आम्ही दुरुस्त केली. त्यामुळे भाजपासोबत जाऊन नाराज होण्याचा प्रश्नच नाही” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. लखनऊ ते लंडन काय प्रकरण आहे? या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “लखनऊमध्ये कोणाची तरी 200 एकर जमीन इन्कम टॅक्सने जप्त केलीय. 800 कोटीचा हा प्रकल्प आहे. त्याची माहिती माझ्याकडे आहे. मी योग्यवेळी माीहिती देईन” तुमच्याकडे पैशाच गोडाऊन आहे, असा आरोप झालाय. त्यावरही एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. “मी सरळ, साधा माणूस आहे. सत्ता, पैशाचा मोह नाही. फाटका माणूस आहे. गोरगरीबांमध्ये असतो. पैशाचा, खोक्याचा मोह कोणाला आहे? हे महाराष्ट्रातील जनता जाणते” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं का? या प्रश्नावर शिंदे म्हणाले की, “ते म्हणत होते की, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचय. पालखीत बसवायच आहे. पण स्वत:चा स्वार्थ जागृत होतो, तेव्हा शिवसैनिक, कार्यकर्त्याची किंमत नसते. मला पदाचा, सत्तेचा मोह नव्हता. शेतकऱ्याच्या मुलाला संधी मिळाली, त्याचं मी सोनं केलं”. राजा का बेटा राजा नही बनेगा, मेहनत करेगा वो राजा बनेगा असं तुम्ही म्हणता, यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “कर्तुत्वाच्या जोरावर माणसाने पुढे आलं पाहिजे. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी मानायचे, हे घरगडी समजतात. कार्यकर्ते मोठे झाले की, भिती वाटते. जे शिवसेना सोडून गेले ते सर्व चुकीचे आहेत का?”
महायुतीमध्ये शिवसेना किती जागा लढवणार?
“2014 आधी अराजकता होती, बॉम्बस्फोट झाले. 2014 नंतर एकतरी बॉम्बस्फोट झालाय का? पंतप्रधान म्हणून एक जरब, धाक असावा लागतो. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची तुलनाच होऊ शकत नाही” असं एकनाथ शिंदे म्हणाले. महायुतीमध्ये शिवसेना किती जागा लढवणार? या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, “महायुतीमध्ये 48 जागा आम्ही लढवतोय. आमचं मिशन 45 आहे”
राज ठाकरेंबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले?
राज ठाकरेंबद्दलही मुख्यमंत्री व्यक्त झाले. “राज ठाकरे चांगला, मोठ्या मनाचा माणूस आहे. कद्रू वृत्तीचा नाही. जे आहे, ते मोकळ्या मनाने बोलतात. त्यांचे सगळे कार्यकर्ते मनापासून काम करतायत” असं एकनाथ शिंदे म्हणाले. “लोक विकासाला मत देणारं, लोकांना घरी बसून शिव्या- शाप देणारे आवडत नाहीत. लोकांना विकास हवाय, विकास आवडतो”