महाराष्ट्र सदन नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षण, मागासवर्गीय बढतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचा विषय, जीएसटीचा परतावा, पीक विमा, चक्रीवादळाने झालेलं नुकसान यांसह महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. (Cm uddhav thackeray met pm Narendra Modi Press Conference maharashtra Sadan New Delhi)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाले. उभय नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. या भेटीत मराठा आरक्षणापासून ते अगदी मुंबई मेट्रोसाठी कांजूरमार्गच्या जागेपर्यंत आणि जीएसटीचा परतावा, पिक विमा, नैसर्गिक आपत्ती आल्यानंतरची मदत अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. भेटीनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण यांनी भेटीचा तपशील माध्यमांसमोर मांडला. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात तिन्ही नेत्यांची विशेष पत्रकार परिषद पाडली.
1)संपूर्ण मराठा समाजासाठी महत्त्वाचा विषय असलेला मराठा आरक्षणचा मुद्दा आम्ही आज पंतप्रधान मोदी यांच्यासमोर मांडला.
2)ओबीसी आरक्षण तसंच मागासवर्गीय आरक्षण हे विषय देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. या विषयांवर देखील आमची पंतप्रधानांनी चर्चा झाली.
3) राज्याचा जीएसचीचा परतावा
4)पीक विम्याचा बीड पॅटर्न
5)कांजूरमार्ग कारशेड मंजुरी
6) नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करनानाचे निकष बदलावेत, 2014 चे निकष आता 2021 मध्ये वापरुन चालणार नाहीत
7)14 व्या वित्त आयोगातील ग्रामीण आणि शहरी भागासाठीचा निधी तातडीने मंजूर करावा
8) मराठी भाषेला अभिजात भाषेला दर्जा मिळावा
9) राज्यपाल नियुक्त 12 आमदार
10) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींशी वैयक्तिक 30 मिनिटे चर्चा केली…
जीएसटी काऊन्सिलमध्ये अनेक वेळा आम्ही सांगितलंय, या अगोदरही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी याच मुद्द्यावरून पत्रव्यवहार केला आह, आजही पंतप्रधानांच्या कानावर टाकलं, महाराष्ट्राला 24 हजार 306 कोटी रुपयांचा जीएसटी परतावा मिळणे बाकी आहे. कोरोनाचे संकट सगळ्या देशावर आणि राज्यांवर आहे, आम्हाला माहिती आहे… परंतु अशाही काळामध्ये परंतु आर्थिक दिलासा देणे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे राज्याचे पैसे जर लवकरात लवकर मिळाले तर बरं होईल…..
(Cm uddhav thackeray met pm Narendra Modi Press Conference maharashtra Sadan New Delhi)
हे ही वाचा :
मराठा आरक्षण ते मेट्रो कारशेड, मुख्यमंत्र्यांनी मोदींपुढे मांडल्या 11 मागण्या; वाचा सविस्तर
‘ते’ दुखणं कायमचं दूर करु, मुख्यमंत्र्यांसमोर अजित पवारांचा पंतप्रधान मोदींना शब्द