मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या (15 जानेवारी) मंत्रिमंडळ बैठकीत सारथी संस्थेतील अनियमिततेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत (Investigation of Sarathi incharge J D Gupta). खासदार संभाजीराजे भोसले यांनी सारथी संस्थेच्या स्वायत्ततेबाबत प्रश्न उपस्थित करत उपोषण केले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजेंना कारवाईचं आश्वासन दिलं होतं. यावर आज अंमलबजावणी करण्यात आली Investigation of Sarathi incharge J D Gupta).
मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंनी केलेल्या ‘सारथी’ संस्थेतील अनियमितेच्या आरोपांवर माहिती घेतली. यानंतर सारथी संस्थेचा कार्यभार असणाऱ्या ओबीसी मंत्रालयाचे सचिव जे. पी. गुप्ता यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या नेमणुकीपर्यंत सारथीचा अतिरिक्त भार पुनर्वसन मंत्रालयाचे सचिव के. डी. निंबाळकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
निंबाळकर संभाजीराजेंनी केलेल्या आरोपांचीही चौकशी करण्याचं काम करतील. ते गुरुवारपासून (16 जानेवारी) याची चौकशी सुरु करतील.
दरम्यान, संभाजीराजेंनी गुप्ता नावाचा अधिकारी हटवला नाही, तर पुढचा मोर्चा मुंबईकडे वळवणार असल्याचा इशारा दिला होता. ते म्हणाले होते, “स्पर्धा परीक्षा मुलांची स्कॉलरशिप बंद केली, त्यामुळं मग सारथी ठेवायची कशाला? जो अधिकारी मुख्यमंत्र्यांना किंमत देत नाही तो कोण लागला, तो हटला नाही तर मग आम्ही पाहू.”
संबंधित बातम्या :
गुप्ताला अन्यत्र हलवलं नाही, तर पुढचा दौरा मुंबईचा : संभाजीराजेंचा इशारा
छत्रपती संभाजीराजेंचे उपोषण मागे
संभाजीराजेंचं उपोषण मागे, ‘सारथी’साठीचा राजेंचा लढा यशस्वी
व्हिडीओ: