मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर शिवसेनेची (Shivsena Meeting) महत्वाची बैठक सुरू आहे. शिवसेना नेते, खासदार आणि प्रवक्त्यांशी उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत. या बैठकीसाठी शिवसेना नेते वर्षावर दाखल झाले आहेत. सध्या प्रवक्त्यांची बैठक सुरू आहे, त्यानंतर खासदारांची बैठक होणार आहे. बैठकीत शिवसंपर्क अभियान (Shivsampark Abhiyan) आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. येत्या 14 मेपासून बेकीसीतील मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर या शिवसंपर्क अभियानाला सुरूवात होत आहे. त्यामुळे या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदुत्वावरून आणि इतर मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेला जोरदार उत्तर देणार हे मात्र नक्की आहे. मात्र आजची बैठकी ही मनसेच्या सभेच्या आधी होत असल्याने आणि मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा आता चांगलाच उचलून धरल्याने ही मनसेची धास्ती आहे का? अशाही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
1) संजय राऊत
2) अरविंद बी सावंत
3) नीलम गोरे
4) प्रियंका चतुर्वेदी
5) सचिन आहेर
6) सुनील प्रभू
7) किशोरीताई पेडणेकर
8) शीतल म्हात्रे
9) शुभा राऊळ
10) किशोर कान्हेरे
11) संजना घाडी
12) आनंदराव दुबे
13) किशोर तिवारी
14) हर्षल प्रधान
15) विनायक राऊत
16) ओमराजे निंबाळकर
17) अनिल देसाई
18) हेमंत पाटील
19 श्रीरंग बारणे
20) धर्यसिल माने
21) संजय मंडलिक
22) भावना गवळी
23)श्रीकांत शिंदे
या बैठकीसाठी राज्यभरातून शिवसेनेचे बडे नेते आज मुंबईतल्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. तसेच मंत्री आदित्य ठाकरे हेही या बैठकीला उपस्थित झाले आहेत. येत्या काळात राज्यात अनेक महापालिका आणि जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका पार पडत आहे. बड्या महानगर पालिकेमध्ये मुंबई महानगर पालिकेचाही समावेश गेल्या तीन दशकांपासून मुंबईत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. मात्र यावेळी शिवसेनेला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली.. तिकडे भाजपच्या बड्या नेत्यांनी मुंबईत पोलखोल यात्रेची सुरूवात केली आहे. त्यालाच जोरदार प्रत्युत्तर म्हणून हे शिवसंपर्क अभियान राबवण्याची दाट शक्यता आहे.
शिवसेना नेत्या भावना गवळी यांना केंद्रीय तपास यंत्रणांनी पुन्हा समन्स बजावला आहे. त्यामुळे त्या या बैठकीला दिसणार की नाही, असा सवाल विचारण्यात येत होत्या. मात्र भावना गवळीही या बैठकीला दिसून आल्या आहेत. त्याचीही बरीच चर्चा रंगली होती.