मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून मान आणि मणक्याच्या त्रस्त आहेत. जवळपास दिवाळीपासून उद्धव ठाकरे यांना हा त्रास जाणवत असल्याची माहिती मिळतेय. त्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या गिरगावातील एच. एन. रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. ठाकरे यांच्यावर उद्या सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान एच. एन. रुग्णालयात शस्त्रक्रिया होईल. डॉ. शेखर भोजराज यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती देण्यात आलीय. (CM Uddhav Thackeray will undergo surgery tomorrow for neck and spine ailments)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचे रिपोर्ट संध्याकाळी आले. हे रिपोर्ट आल्यानंतर वरिष्ठ डाँक्टर रिपोर्ट तपासतील आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. वरिष्ठ डॉक्टरांचा मुख्यमंत्र्यांना एक लहान शस्रक्रिया करण्याचा सल्ला आहे. मात्र शस्त्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय ठाकरे कुटुबीयांशी चर्चा करून घेण्यात आली. तसंच मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय तपासणी संदर्भात HN रिलायंन्स हाँस्पिटल कोणतीही मेडिकल बुलेटीन प्रसिद्ध करणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती संदर्भातील अधिकृत माहीती मुख्यमंत्री कार्यालयच देणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होत आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. तसेच यावेळी त्यांनी काही शारीरिक चाचण्या केल्या होत्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन करत प्रवाशांना वेठीस धरणारं आंदोलन करु नका, असं आवाहन केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे. अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
इतर बातम्या :
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची सतेज पाटलांकडून दखलही नाही, महाडिकांचा आरोप; राजीनामा देण्याची मागणी
भाजप नेत्यांवरील ईडी कारवाईचं काय झालं?, राष्ट्रवादी जाब विचारणार; ईडी कार्यालयावर धडकणार
CM Uddhav Thackeray will undergo surgery tomorrow for neck and spine ailments