मुंबई: विधानसभा सभागृहात भाजप सदस्यांनी केलेल्या राड्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरमेनं मान खाली जाईल असं कालचं दृश्य होतं. मी नवीन आमदार आहे. पण कालचा प्रकार पाहून मी अवाक् झालो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. (cm uddhav thackeray’s first reaction on chaos in maharashtra assembly)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कालच्या प्रकारावर भाष्य केलं. बाळासाहेब थोरात हे सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्य आहे. त्यांच्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पहिल्यांदाच असा प्रकार पाहिला. माझ्या पहिल्याच कारकिर्दीत मला हा प्रकार पाहायला मिळाला. त्यामुळे मी अवाक् झालो. ही लाजीरवाणी घटना आहे. यातून आपण कामाचा दर्जा उंचावतो की दर्जा खालावतो याचं भान विरोधकांना राहिला नाही. विरोधकांचं असं वागणं महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही. शरमेनं मान खाली जावं असं दृश्य होतं. जबाबदार विरोधी पक्षाकडून हे होणं वाईट आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
त्यांनी आमच्या 12 आमदारांची नियुक्ती केली नाही. म्हणून त्यांच्या 12 आमदारांना निलंबित केलं असं नाही. हे आम्ही ठरवून केलं नाही किंवा ठरवलं नव्हतं. आम्ही त्यांना टोचलं नव्हतं. त्यांनीच ते केलं. आरडाओरड करणं ही लोकशाही नाही. हे आरोग्यदायी लोकशाहीचं लक्षण नाही. अशी लोकशाही असेल तर ती रस्त्यावर जाऊन करा, असंही ते म्हणाले. भास्कर जाधव यांनी सभागृहात त्यांच्या दालनातील अर्धवट वर्णन केलं. त्यांनी पूर्ण वर्णन केलं नाही. शिसारी येणारं हे प्रकरण होतं. हा पायंडा पडू नये, महाराष्ट्रात असं होऊ नये. त्यांचा जर सत्ता ऐके सत्ता हा अट्टाहास असेल तर खूप वाईट आहे, असं ते म्हणाले.
सध्या कोरोनाची परिस्थिती आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही, हे मी राज्यपालांना कळवलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
विरोधकांनी कितीही राजकारण केलं तरी आम्ही जनतेच्या जीवाशी खेळणार नाही. राजकारण करणार नाही. आम्ही एवढे नीच वागणार नाही, अशी तिखट प्रतिक्रियाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. (cm uddhav thackeray’s first reaction on chaos in maharashtra assembly)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 6 July 2021 https://t.co/TTEcHbMxOx #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 6, 2021
संबंधित बातम्या:
ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनाच्या अहंकारासारखाच; फडणवीसांचा घणाघाती हल्ला
Monsoon Session Live Updates | बोगस लसीकरण करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार : उद्धव ठाकरे
कृपाशंकर सिंह बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार; पालिका निवडणुकीची समीकरणे बदलणार?
(cm uddhav thackeray’s first reaction on chaos in maharashtra assembly)