Ketaki Chitale विरोधात यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल – tv9
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षपार्ह शब्दात टीका केल्याप्रकरणी केतकीवर आता ता यवतमाळ मध्ये ही गुन्हा दाखल झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी सध्या पोलिस कोठडीत असलेली अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिच्याभोवती अडचणींचा फास अधिकाधिक आवळला जात आहे. अभिनेत्री चितळे हिच्या विरोधात आता यवतमाळ मध्ये ही पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर अत्यंत खालच्या स्तराला जाऊन अभिनेत्री केतकी चितळे हिने सोशल मिडियावर कविता पोस्ट केली होती. या नंतर केतकी चितळेच्या विरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. चितळे हिच्या आक्षेपार्ह पोस्टनंतर राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Published on: May 20, 2022 03:27 PM
Latest Videos