सूरत पाठोपाठ आणखी एक मतदारसंघात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. सूरतमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या पलटीमुळे भाजपाच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. लोकसभा निवडणुकीत भाजपाचा हा देशात पहिला विजय ठरला. सूरतनंतर आता काँग्रेसला मध्य प्रदेशात धक्का बसला आहे. इंदूरमध्ये काँग्रेस उमेदवार अक्षय बामने आपली उमेदवारी मागे घेतली. उमेदवारी मागे घेऊन अक्षय बामने भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे इंदूरमध्ये आता काँग्रेसच आव्हान उरलेलं नाहीय. अक्षय भाजपा आमदार रमेश मेंदोला यांच्यासोबत आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गेले होते.
इंदूर लोकसभा क्षेत्रातून भाजपाने विद्यमान खासदार शंकर लालवानी यांना तिकीट दिलं आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर कैलाश विजयवर्गीय यांनी टि्वट केलं. इंदूरमधील काँग्रेस लोकसभा उमेदवार अक्षय कांती बाम यांचं पीएम मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, सीएम मोहन यादव आणि प्रदेश अध्यक्ष वीडी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजपात स्वागत आहे.
‘भाजपाने निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या’
इंदूरमधून अक्षय बाम यांनी उमेदवारी मागे घेण्यावर काँग्रेस नेते मुकेश नायक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ही पक्षासोबत फसवणूक आहे. भाजपाने निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. खजुराहोप्रमाणे काँग्रेस आता इंदूरमध्ये कुठल्या अन्य उमेदवाराला पाठिंबा देण्याचा विचार करेल”
इंदौर से कांग्रेस के लोकसभा प्रत्याशी श्री अक्षय कांति बम जी का माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी, राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda जी, मुख्यमंत्री @DrMohanYadav51 जी व प्रदेश अध्यक्ष श्री @vdsharmabjp जी के नेतृत्व में भाजपा में स्वागत है। pic.twitter.com/1isbdLXphb
— Kailash Vijayvargiya (Modi Ka Parivar) (@KailashOnline) April 29, 2024
कधी उमेदवारी अर्ज भरलेला?
अक्षय बामने उमेदवारी मागे घेण्यावर भाजपा नेते नरेंद्र सलूजा म्हणाले की, “मध्य प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांचं गृहनगर इंदूर काँग्रेस मुक्त झालं आहे. मोठ मोठे दावे करणाऱ्या पटवारींनी इंदूरमध्ये काँग्रेसची काय स्थिती आहे ते पहाव. जीतू पटवारी यांनी आता आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे” अक्षय बमने पाच दिवसांपूर्वी 24 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. इंदूर, उज्जैनसह आठ लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे.