मुंबई : शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत (Nationalist Congress) सत्तेत आल्यामुळे काँग्रेस (Congress) पक्षाला आणखी बळ मिळालं आहे. यामुळे आता आणखी बळाने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या व्यवस्थापनाकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राज्य स्तरीय निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना केली आहे. (Congress establishes Election Management Committee for local body elections)
या 13 सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात आहेत. तर उपाध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर आहेत. समितीच्या समन्वयकपदी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ऍड. गणेश पाटील आणि सदस्यपदी प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, माजी मंत्री पद्माकर वळवी, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, प्रकाश मुगदिया, सरचिटणीस राजाराम पानगव्हाणे, इब्राहिम भाईजान, महेंद्र घरत, प्रविण देशमुख, प्रदेश चिटणीस नाना गावंडे, रणजीत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर प्रदेश पातळीवरील या कमिटीसोबतच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय निवडणूक व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. खरंतर, राज्यात सध्या तीन चाकी सरकार असलं तरी काँग्रेसला आणखी मोठं करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी काँग्रेसचे सगळे नेते मोठ्या उत्साहाने काम करताना दिसत आहेत. (Congress establishes Election Management Committee for local body elections)
काँग्रेसला आणखी उभारी देण्यासाठी बाळासाहेब थोरात यांचे हात बळकट करायचे आहेत असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं. पृथ्वीराज चव्हाण हे देश पातळीवरील नेते आहेत.आम्हाला त्यांच्या मार्गदर्शानाची गरज असल्याचं थोरात यांनी म्हटलं होतं. महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहोत. मात्र, त्यातूनही आपल्याला काँग्रेला बळकट करायचं आहे. काँग्रेसला बळकट करण्यासाठी बाळासाहेब थोरात यांचेही हात बळकट करायचे आहेत, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. त्यामुळे या समितीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने आता कंबर कसून कामाला सुरुवात केल्याचं चित्र आहे.
इतर बातम्या –
तीन पक्षांचं सरकार पण काँग्रेसला बळकट करायचेय, बाळासाहेब थोरातांना बळ द्या: पृथ्वीराज चव्हाण
Balasaheb Thorat | ठाकरे सरकारची वर्षपूर्ती ते अभिनंदन मुलाखत, बाळासाहेब थोरात Exclusive
काँग्रेस पक्ष संपलाय, अजूनही हॉलिडे मूडमध्ये राहिले तर कल्याणच होईल: प्रकाश आंबेडकर https://t.co/xCPNZYwwam @Prksh_Ambedkar #Congress #RahulGandhi #biharelection2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 24, 2020
(Congress establishes Election Management Committee for local body elections)