नागपूर : नागपूर पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी (Abhijit Wanjarri Record) यांनी दोन रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. पहिलं म्हणजे, गेल्या 55 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात (Nagpur Graduate Constituency Election) काँग्रेसने झेंडा फडकवला. त्यासोबतच अभिजीत वंजारी यांनी मतांचाही रेकॉर्ड मोडला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारी यांना रेकॉर्डतोड मतं पडली आहेत. मतांच्या बाबतीत त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनाही मागे टाकलं आहे (Abhijit Wanjarri Record).
नागपूर पदवीधर मतदार संघात अभिजीत वंजारी यांनी 55 वर्षांपासूनचा भाजपचा गड काबीज केला. त्यांनी भाजप उमेदवार आणि नागपूरचे महापौर संदीप जोशी (Sandeep Joshi) यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. अभिजीत वंजारी यांना या निवडणुकीत 55 हजार 947 मतं पडली. ही मतं गेल्या 18 वर्षातील सर्वाधिक मतं आहेत.
2008 च्या निवडणुकांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 52 हजार 761 मतं प्राप्त झाली होती. मात्र, यंदा अभिजीत वंजारी यांनी प्रथम पसंतीमध्ये 55 हजार 947 मतं मिळवली आहे. ही मतं गेल्या 18 वर्षातील सर्वाधिक मतं आहेत. 2014 मध्ये भाजप चे अनिल सोले यांनी 52 हजार 484 मतं घेतली होती. त्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता (Abhijit Vanjari Record).
भाजपचा बालेकिल्ला 55 वर्षांनी खालसा, नागपूर पदवीधर मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा, अभिजीत वंजारी विजयी https://t.co/V9qDziVT2p #AbhijeetVanjari @INCMaharashtra @BJP4Maharashtra #Nagpur #NagpurGraduateConstituency #GraduateConstituency2020 #VidhanParishad
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 4, 2020
Abhijit Wanjarri Record
संबंधित बातम्या :