अहमदनगर : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अखेर कोरोनावर मात केली आहे. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येताच त्यांनी पुन्हा एकदा आपल्या दौऱ्यांना सुरुवात केली आहे. कोरोनातून बरे होताच त्यांनी आपल्या मतदार संघामध्ये बैठक घेतली. या बैठकीमध्ये थोरात यांनी तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना त्यांनी नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सर्वाजनिक ठिकाणी गर्दी करू नका, आवश्यकता असेल तरच घरातून बाहेर पडा. बाहेर पडताना मास्कचा वापर करा असे आवाहन थोरात यांनी केले आहे.
पुढे बोलताना थोरात म्हणाले की, राज्यात तिसरी लाट आली आहे, असे म्हणायला हरकत नाही. कोरोनामुळे कोणालाही त्रास होऊ शकतो. हे मी माझ्या अनुभवातून सांगतो आहे. गेल्या दोन वर्षांपासून आपन लॉकडाऊनचा सामना करत आहोत. लॉकडाऊनमुळे आधिच मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता जर लॉकडाऊन नको असेल तर सर्वांनी शिस्त पाळली पाहिजे. कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे. अधिवेशनामुळे कोरोनाच जास्त प्रादुर्भाव झाला असे माझे वैयक्तीक मत आहे. अनेक लोकप्रतिनिधिंना कोरोनाची लागण झाली. एकत्र आल्याचा काय परिणाम होतो, हे सर्वांनीच अनुभवले त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळावी असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
यावेळी बोलताना त्यांनी इ पीक पाहणी प्रकल्पावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात यशस्वी ठरलेला हा प्रकल्प राजस्थान सरकारने स्वीकारला. आता राजस्थानमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. इ गिरदावरी या नावाने राजस्थानमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाला राज्यात मिळालेले यश पहाता लवकरच संपूर्ण देशात हा प्रकल्प स्वीकारण्यात येईल असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
‘आघाडी सरकारच्या बेपर्वाईमुळे राज्याची आरोग्य आणि आर्थिक घडी बिघडली’, भाजपचा घणाघात