लाल किल्ल्यावर आज स्वातंत्र्य दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. राहुल गांधी यावेळी रिजर्व सीट सोडून सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन बसले. काँग्रेस खासदाराने असं का केलं? त्यावर संरक्षण मंत्रालयाकडून स्टेटमेंट आलं आहे. मंत्रालयानुसार, राहुल यांच्यासाठी पुढची सीट राखीव ठेवण्यात आली होती. पण त्यांनी आपल्या मर्जीने पाठच्या रांगेत बसण्याचा निर्णय घेतला.
स्वातंत्र्य दिनाचा सोहळा असल्याने विरोधी पक्ष नेता असल्याने राहुल गांधींसाठी पुढच्या रांगेतील सीट रिजर्व ठेवण्यात आली होती. पण त्यांनी आपल्या मर्जीने मागे बसायचं ठरवलं. तिथे व्यवस्था पाहणाऱ्या लोकांना राहुल गांधी यांनी सांगितलं की, “मला सामान्य लोकांमध्ये बसायचं आहे. इथे उपस्थित असलेल्या नेत्यांसोबत तर मी नेहमी सभागृहात बसतो” संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
राहुल गांधी ज्या रांगेत बसलेले तिथे…
राहुल गांधी ज्या रांगेत बसले होते, तिथे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले खेळाडू बसले होते. राहुल गांधी यांच्या पुढच्या रांगेत भारतीय हॉकी टीमचा गोलकीपर पीआर श्रीजेश, कॅप्टन हरमनप्रीत सिंह बसलेले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन मेडल जिंकणारी शूटर मनू भाकरही तिथे होती.
10 वर्षानंतर झालं असं
लाल किल्ल्यावरील सोहळ्यात राहुल गांधी यांच्या सहभागासह विरोधी पक्षांचा 10 वर्षाचा दुष्काळही संपला. 2014 आणि 2019 मध्ये भाजपाने इतका मोठा विजय मिळवला की, विरोधी पक्ष नेतेपद रिकामी होतं. कारण विरोधी पक्ष नेत्याचं संविधानिक पद मिळवण्याइतपत जागा विरोधी पक्ष जिंकू शकला नव्हता. 2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रदर्शनात सुधारणा झाली. लोकसभेत त्यांच्या खासदारांची संख्या 52 वरुन वाढून 99 झाली. त्यानंतर 25 जूनला राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली.
सभी देशवासियों को स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं।
हमारे लिए स्वतंत्रता सिर्फ एक शब्द नहीं – संवैधानिक और लोकतांत्रिक मूल्यों में पिरोया हुआ हमारा सबसे बड़ा सुरक्षा कवच है।
यह शक्ति है अभिव्यक्ति की, क्षमता है सच बोलने की और उम्मीद है सपनों को पूरा करने की।
जय हिंद। 🇮🇳 pic.twitter.com/foLmlSyJDk
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 15, 2024
राहुल गांधी यांनी काय म्हटलं?
राहुल गांधी यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. “सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आमच्यासाठी स्वातंत्र्य फक्त एक शब्द नाहीय. संविधानिक आणि लोकशाही मुल्यांच्या दृष्टीने हे एक सुरक्षा कवच आहे. ही अभिव्यक्तीची शक्ती आहे” असं राहुल यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.