मुंबई : नाना पटोले ( Nana Patole) आज दिवसभरात चर्चेत आहेत. त्याची दोन कारणं आहेत. पहिलं, त्यांनी काल अकोल्यात केलेलं वक्तव्य आणि आज पुन्हा अमरावतीत केलेलं वक्तव्य. दोन वक्तव्यांमुळे नाना पटोलेंची जोरदार चर्चा होते आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांकडून अशी वक्तव्य महाराष्ट्राला ऐकायची सवय नाही, तशी आक्रमता नाना पटोले दाखवत असल्याचं जाणकारांना वाटतं. (Congress Maharashtra president Nana Patole said next election will be in November month appreciated Yashomati Thakur)
नाना पटोले हे विदर्भातल्या काही दौऱ्यांच्या जिल्ह्यावर आहेत. आज ते अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा मतदारसंघात होते. मंत्री यशोमती ठाकूर ह्या तिवसा विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात. नाना पटोले हे आगामी निवडणुकांसाठीची काँग्रेसची मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाचं कौतूक करताना पटोले म्हणाले की, तुम्हाला मी विधानसभेत गेली अनेक वर्ष पहातोय. ह्या भागाच्या लोकांसाठी सातत्यानं भांडणारी रणरागिनी आम्ही पाहिली. वेळ आली तर तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अंगावरही जायला मागे पुढे पहात नाही. जे लीड आपल्याला मिळालं, त्यापेक्षा जास्त मतानं आपला उमेदवार ह्या भागातून निवडुण यायला पाहिजे.
याच कार्यक्रमात नाना पटोले यांनी नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात निवडणुकाच निवडणूका असल्याचं जाहीर केलं. त्यासाठी काँग्रेस नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी तयारी करावी असं सांगायलाही पटोले विसरले नाहीत. विशेष म्हणजे मंत्री यशोमती ठाकूर यांनी तिवश्याला काँग्रेसचं संघटनात्मक मॉडेल म्हणून तयार करावं, जे संपूर्ण महाराष्ट्रात राबवता येईल अशी अपेक्षाही पटोले यांनी संबोधनात व्यक्त केली. सर्वात महत्वाचं म्हणजे 2024 साली ग्रामगीतेच्या आधारावर सरकार चालवू अशी घोषणाही पटोलेंनी केली आहे. ग्रामगीता हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा महान ग्रंथ मानला जातो.
पाहा व्हिडीओ :
नाना पटोले काल अकोल्यात होते. तिथं त्यांनी एका सत्काराच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली. आधीच आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन घमासान सुरु आहे. त्यात नानांनी इच्छा बोलून दाखवल्यानंतर आघाडीच्या राजकारणात चर्चेला ऊतच आला. त्याही कारणामुळे नाना पटोले कालपासून चर्चेत आहेत. नाना पटोलेंची ही आक्रमकता प्रत्यक्षात काँग्रेसला किती यश देते हे पहाणेही तेवढंच महत्वाचं आहे. कारण नानांच्या महत्वाकांक्षेची राष्ट्रवादी काँग्रेसनं खिल्ली उडवलीय तर त्यांचेच विदर्भातले सहकारी विजय वडेट्टीवार यांनी मिश्किलपणे शुभेच्छा दिल्यात.
इतर बातम्या :
“प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी, नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी”
राष्ट्रवादीसोबतही मुख्यमंत्रीपदावरुन सेनेचा ‘शब्द’ देण्याचा वाद? राऊतांचं नाशकातही रोखठोक ‘5 वर्ष’
(Congress Maharashtra president Nana Patole said next election will be in November month appreciated Yashomati Thakur)