मुंबईत येत्या सोमवारी 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्याच मतदान होत आहे. आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. आज संध्याकाळी प्रचाराची वेळ संपेल. त्याआधी इंडिया आघाडीने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे आघाडीचे मोठे नेते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर दिली. यावेळी एका पत्रकाराने काँग्रेस अध्यक्ष खरगे यांना आरक्षणाबद्दल प्रश्न विचारला. तुम्ही सत्तेवर आलात, तर सर्व आरक्षण रद्द करुन फक्त आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकांना आरक्षण देणार का?
त्यावर मल्लिकार्जुन खरगे यांनी असं उत्तर दिलं. “संविधानात जे आरक्षण दिलय, आम्ही त्याच्यासोबत आहोत. आर्थिक दृष्ट्या कमजोर घटकांना 10 टक्के आरक्षण दिलय, ते नैसर्गिक आहे, तसच राहणार. आरक्षण हा राज्यांचा विषय सुद्धा येतो. राज्यांकडून आरक्षणासंदर्भात काही शिफारशी येतात. मागासवर्ग आयोग, एससी, एसटी कमिशन पडताळणी करुन ते पाठवतात. तुम्ही आज मला विचारलं, मी हो म्हटलं असं होऊ शकत नाही. ती एक प्रोसेस आहे. जे संविधानात आरक्षण आहे, ते तसच राहणार. त्याला कोणी टच करणार नाही, जर कोणी टच केलं, तर मोठ आंदोलन होईल” असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
#WATCH | Mumbai: On AAP, Congress president Malliakarjun Kharge says, “We have alliance only on 3 seats in Delhi, there is alliance in Chandigarh, we have given them seats in Gujarat and Haryana, we will work there only. But we are fighting against each other in Punjab. This is a… pic.twitter.com/NqrmloISFf
— ANI (@ANI) May 18, 2024
आर्टिकल 370 पुन्हा लागू करण्यावर खरगेंच उत्तर काय?
काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली, तर जम्मू-काश्मीरमध्ये आर्टिकल 370 पुन्हा लागू होणार का? तुमच्या पक्षाची भूमिका काय? यावर मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, “जे आम्ही जाहीरनाम्याात आश्वासन दिलय ते करु. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे म्हणतात, त्या प्रत्येक गोष्टीला मी उत्तर द्यायला बांधिल नाही. पंतप्रधान मोदी कधी बोलतात, माओचा जाहीरनामा आहे, कधी मुस्लिमांचा जाहीरनामा बोलतात. लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करतात. मी त्यात पडणार नाही”