मुंबई : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gadhi) यांची आज ईडीकडून चौकशी (ED Enquiry )होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसकडून राज्यव्यापी आंदोलनं केली जात आहे. “सोनिया गांधी यांची चौकशी हा सुद्धा याच षडयंत्राचा भाग आहे. केंद्र सरकारच्या या जुलूमी, अत्याचारी व हुकूमशाहीविरोधात आम्ही रस्त्यावर उतरलोय”, असं काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात येतंय. आज मुंबईसह राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे. तर काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपवर निशाणा साधण्यात येतोय. “भाजपकडे ईडी,पोलिस, लाठ्याकाठ्या, गोळ्या अपप्रचाराची भाषा, पण आमच्यासोबत संविधान आहे, सत्य, साहस, संयम आणि जनता”, असं ट्विट काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलंय. तर काँग्रेसच्या या आंदोलनांवर भाजपकडूनही हल्लाबोल करण्यात येतोय.
ED उनकी
पुलिस उनकी
लाठी उनकी
गोली उनकी
दुष्प्रचार की
बोली उनकी हे सुद्धा वाचाहमारे साथ है
संविधान
सत्य
साहस
संयम
और जनता#सत्य_साहस_सोनिया_गांधी— Congress (@INCIndia) July 21, 2022
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज ईडीकडून चौकशी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसकडून राज्यव्यापी आंदोलनं केली जात आहे. “सोनिया गांधी यांची चौकशी हा सुद्धा याच षडयंत्राचा भाग आहे. केंद्र सरकारच्या या जुलूमी, अत्याचारी व हुकूमशाहीविरोधात आम्ही रस्त्यावर उतरलोय”, असं काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात येतंय. आज मुंबईसह राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांची ईडीमार्फत केली जाणारी चौकशी ही राजकीय द्वेषातून केली जात आहे. केंद्रीय तपाय यंत्रणा या मोदी सरकारच्या कठपुतली बाहुल्या झाल्या असून सरकारच्या इशाऱ्यावर त्या केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कारवाई करत आहेत.
याच प्रकरणात याआधी राहुल गांधी यांचीही पाच दिवस दररोज 10-10 तास चौकशी करण्यात आली. आता सोनिया गांधी यांची चौकशी केली जात आहे. वास्तविक पाहता नॅशनल हेराल्ड प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. 2015 साली बंद झालेले हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यामागे काँग्रेस पक्ष व गांधी कुटुंबाला नाहक त्रास देणे व त्यांचा छळ करण्याचा प्रकार आहे. परंतु काँग्रेस पक्ष भाजप आणि मोदी सरकारच्या या दडपशाहीला भीक घालत नसून आम्ही लोकशाही मार्गाने उत्तर देणार असल्याचे सांगितले.