मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे (Congress spokesperson Raju Waghmare answers bjp minister raosaheb danve). “रावसाहेब दानवे यांनी ‘अमर-अकबर- अँथनी’ चित्रपट पूर्ण बघितलेला दिसत नाही. या चित्रपटात अमर, अकबर, अँथनी एकमेकांच्या पायात अडकून पडत नाहीत तर एकत्र मिळून खलनायकाचा नाश करतात. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार भाजपरुपी खलनायकाचा नक्कीच नाश करेल”, असा घणाघात राजू वाघमारे यांनी केला (Congress spokesperson Raju Waghmare answers bjp minister raosaheb danve).
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
राजू वाघमारे नेमकं काय म्हणाले?
“रावसाहेब दानवे बरोबर म्हणाले आहेत. महाविकास आघाडीचं सरकार हे अमर, अकबर, अँथनीचं सरकार आहे. राज्य घटनेने सांगितलेलं सर्वधर्म समभावाचं हे सरकार आहे. हे सरकार अमर, अकबर, अँथनीचं आहे, हे आम्ही मान्य करतो”, असं राजू वाघमारे म्हणाले.
हेही वाचा : अमर, अकबर, अँथनी पायात पाय घालून आपोआप पडतील, दानवेंचा महाविकास आघाडीला टोला
“रावसाहेब दानवेंनी ‘अमर-अकबर-अँथनी’ चित्रपट पूर्ण बघितलेला दिसत नाही. या चित्रपटात अमर, अकबर, अँथनी एकमेकाच्या पायात अडकून पडत नाहीत तर एकत्र मिळून खलनायकाचा नाश करतात. या देशात खलनायक हा भाजप पक्ष आहे, हे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार हे भाजपरुपी खलनायकाचा आगामी काळात नक्कीच नाश करेल”, असा घणाघात वाघमारे यांनी केला.
“अमर, अकबर आणि अँथनी यांचा चित्रपटात जसा विजय झाला तसाच महाराष्ट्राच्या राजकारणातही अमर, अकबर, अँथनी यांचाच विजय होणार”, असा दावा राजू वाघमारे यांनी केला.
रावसाहेब दानवे काय म्हणाले?
राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अमर, अकबर अँथनीचं सरकार आहे. ते पायात पाय घालून आपोआपच पडेल, असा टोमणा भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी, केंद्र सरकार तर मदत करतच आहे, असंही दानवे म्हणाले.
राममंदिराच्या पायाभरणीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण आले किंवा नाही आले, तरी पायाभरणीला त्यांनी जावे. शिवसेनेचा नारा होता की ‘पहले मंदिर, फिर सरकार’ आता मात्र पहिले सरकार फिर मंदिर असे झाले आहे. उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राममंदिरच्या पायाभरणीसाठी प्रमाणपत्र घ्यावे लागेल, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.
रावसाहेब दानवेंच्या टीकेला युवक काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर
“देशात ‘अमर-अकबर-अँथनी’ कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत, असे भाजपला स्थापनेपासूनच वाटत आले आहे” असे उत्तर महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिले आहे.
“दानवे साहेब , भाजपाला स्थापनेपासूनच वाटत आले आहे की, या देशात ‘अमर अकबर अँथनी’ कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर यांनीसुद्धा ‘बंच ऑफ थॉट्स’ मध्ये हीच शिकवण दिली आहे, इतिहास साक्ष आहे. बाकी, महाराष्ट्र विकास आघाडीची चिंता नसावी !” असे ट्वीट सत्यजीत तांबे यांनी केले आहे.
हेही वाचा : “देशात ‘अमर-अकबर-अँथनी’ एकत्र राहू नयेत असे भाजपला वाटते” दानवेंच्या टीकेला काँग्रेसचे उत्तर