मुंबई : “देशात कोरोनाचं भयंकर संकट आहे. पण चंद्रकांतदादांना सत्ता गेल्याचं दु:ख आहे”, असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे (Raju Waghmare slams Chandrakant Patil) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्यात वाक-युद्ध सुरु होतं. त्यात आज कॉंग्रेस आमदार आणि कृषि राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी उडी घेतली होती. त्याच्यापाठोपाठ आता काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनीदेखील यात उडी घेतली आहे (Raju Waghmare slams Chandrakant Patil).
“देशात कोरोनाचं भयंकर संकट आहे. पण भाजपला अजूनही सत्तेची भूक आणि लालच आहे. चंद्रकांत पाटील यांना हातातून सत्ता गेल्याचं दु:ख सहन झालेलं नाही आणि हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेतून दिसून येतं. दादा, सत्ता आणि राजकारण करायचंच आहे. पण वेळेचं भान असलेलं बरं”, अशी टीका राजू वाघमारे यांनी केली.
कोरोनाविरोधाच्या लढाईत भाजपचे नेतेमंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेला मदत करत आहेत. लोकांना मास्क, सॅनेटायझर किंवा जेवण देत आहेत. या कामांचे फोटो किंवा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केले जात आहेत आणि त्यासोबत #BJP4Seva अशी हॅशटॅग मोहिम राबवली जात आहे. या हॅशटॅगवरही राजू वाघमारे यांनी टीका केली.
देशात भयंकर #कोरोनावायरस वादळ,पण #BJP4Seva सांगून,सत्तेची भूक,लालच व गेल्याचे दुःख दादांना @ChDadaPatil सहन होत नाही,हे @CMOMaharashtra उद्धवजी ठाकरेंनवर सतत केलेल्या टिकेतून दिसून येते,दादा सत्ता व राजकारण करायचेच आहे,वेळेचे भान असलेले बरे! @TV9Marathi, https://t.co/tMEeL1oi8p pic.twitter.com/PlbOhSPy6R
— Dr. Raju waghmare (@drrajuwaghmare) April 13, 2020
जयंत पाटील-चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध
पहिला प्रहार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपालनियुक्त आमदार होऊ शकत नाहीत यावरुन चंद्रकांत पाटील यांनी टीकेला सुरुवात केली होती. मुख्यमंत्री हे राज्यपाल कोट्यातून आमदार होऊ शकत नाही, घटनात्मकदृष्ट्या तसं होऊ शकत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
दुसरा पलटवार – जयंत पाटील यांनी विरोधीपक्षांना कोरोनाविरोधातील कामावर लक्ष देण्यास सांगितलं होतं. सगळा देश आणि महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या विरोधात लढाई लढतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन संदर्भातील धोरणे सर्वांशी चर्चा करून ठरवत आहेत. सर्व लोक त्यांना सहकार्य करत आहेत. अशा वेळी तुम्हाला राजकारण सुचते, याचे मला कौतुक वाटते, असं जयंत पाटील म्हणाले होते.
तिसरी टीका – जयंत पाटलांच्या टीकेवर प्रत्युत्तर देत चंद्रकांत पाटलांनी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या कामाचा पाढा वाचला. तसेच, कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी व्हायचे आवाहन आम्हाला करण्यापेक्षा तुमच्या स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे तुमच्या आघाडी सरकारमधील सहकारी पक्षांना करा, असा सल्लाही दिला होता.
चौथा हल्ला – “चंद्रकांतदादा, कोरोना आजाराचा साठीच्या वरील लोकांना अधिक धोका उद्भवतो. त्यामुळे, आपण जास्त बाहेर फिरु नका. स्वतःची काळजी घ्या. काही कमी जास्त लागल तर कळवा. मी आहेच ना आपल्या मदतीला. आपलाच, जयंत पाटील”, असं ट्विट जयंत पाटलांनी केलं होतं.
संबंधित बातम्या :
‘दादा, कोरोनाचा साठीच्या वरील लोकांना अधिक धोका, काळजी घ्या’, जयंत पाटलांचा टोला