मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लसीकरण मोहीम पूर्णपणे केंद्र सरकार हाती घेणार असल्याची घोषणा नुकतीच केली आहे. 21 जूनपासून देशभरात 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्यात येईल अशी घोषणा केलीय. पंतप्रधानांच्या या घोषणेनं स्वागत होत असतानाच काँग्रेससह अन्य विरोधकांनी मोदींवर टीकाही केलीय. काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केलीय. राऊत यांनी एक कार्टुन ट्वीट करुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. (Nitin Raut criticizes PM Narendra Modi over corona vaccination campaign)
‘आमचे नेते राहुल गांघी यांनी सुरुवातीलाच रस्ता दाखवला होता. राहुल गांधी कोरोनाच्या सुरुवातीपासूनच सरकारला खबरदार करत होते. तसंच उचित सल्लाही देत होते. अहंकाऱ्यांनो, जरा शिका’, असं ट्वीट करत नितीन राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केलीय. या ट्वीटमध्ये राऊत यांनी एक फोटोही ट्वीट केलाय. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती एक काठी आहे. ही काठी पकडून राहुल गांधी मोदींना मार्ग दाखवत असल्याचं पाहायला मिळतंय. या फोटोत वरच्या कोपऱ्यात राहुल गांधी यांनी केलेल्या ट्वीटचा एक स्क्रिन शॉटही दाखवण्यात आलाय. त्यात लसीची खरेदी केंद्र सरकारने करावी आणि वितर राज्य सरकारांनी. जेणेकरुन गावापर्यंत लस पोहोचेल, असं राहुल गांधी यांनी सूचवलं होतं असं सांगण्यात आलं आहे.
हमारे नेता @RahulGandhi ने पहले ही रास्ता दिखा दिया था।
मा. राहुल गांधी कोरोना की शुरुआत से ही सरकार को ख़बरदार भी कर रहे हैं और उचित सलाह भी दे रहे हैं।
अहंकारियों सीखो!@INCIndia #CoronaVaccine pic.twitter.com/FVuz5DBPsb— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) June 9, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी देशातील जनतेशी संवाद साधला. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना केंद्र सरकार मोफत लस देईल. आता लसीकरणाची 100 टक्के जबाबदारी केंद्र सरकारची असेल. राज्य सरकारला एक पैसाही खर्च करण्याची गरज राहणार नाही, असंही पंतप्रधान मोदी म्हणालेत. गेल्या 100 वर्षात अशी महामारी आली नव्हती. देशाने या संकटाचा अनेक आघाड्यांवर सामना केला आहे. गेल्या दीड वर्षात आपण हेल्थ केअर स्ट्रक्चर वाढवण्यात आले आहे. मेडिकल ऑक्सिजनची या देशात कधीच एवढी कमतरता जाणवली नव्हती. त्यासाठी सैन्य दलाच्या तिन्ही तुकड्यांना कामाला लावण्यात आल्या. जगातील कानाकोपऱ्यातून जे काही आणणं शक्य होईल ते आपण आणून या संकटाचा सामना केला, असं मोदी म्हणाले.
देश की किसी भी राज्य सरकार को वैक्सीन पर कुछ भी खर्च नहीं करना होगा।
अब तक देश के करोड़ों लोगों को मुफ्त वैक्सीन मिली है। अब 18 वर्ष की आयु के लोग भी इसमें जुड़ जाएंगे।
सभी देशवासियों के लिए भारत सरकार ही मुफ्त वैक्सीन उपलब्ध करवाएगी: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 7, 2021
संबंधित बातम्या :
दिवाळीपर्यंत गरिबांना मोफत धान्य, मोदी सरकारची मोठी घोषणा
Nitin Raut criticizes PM Narendra Modi over corona vaccination campaign