मुंबई – शिवसेनेच्या (Shivsena) नगरसेविका शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्या कार्यकर्त्यांनी एका तरुणाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नेमकी तरुणाला मारहाण का केली हे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु ही घटना सीसीटिव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले आहे. या प्रकरणी तरुणाने एमएमबी पोलिस स्टेशन गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळाली आहे.पण अशा प्रकारे लोक प्रतिनिधी सामान्य नागरिकांना मारहाण करीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सीसीटिव्हीत कैद झालेल्या सर्व आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. आरोपी ताब्यात घेतल्यानंतर मारहाण का केली याची शहानिशा होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शिवसेना माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचे 4 ते 5 कार्यकर्ते एकत्र येऊन एका तरुणाला मारहाण करत असल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी बोरिवली येथील एमएच बी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अश्याप्रकारे लोक प्रतिनिधी याच्या कडून कायदा हातात घेत असल्यामुळे नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आलेले तरुण एका इमारतीच्या शेजारी उभे आहेत. तक्रारदार तरूण इमारतीमधून खाली येताचं त्याला मारहाण करण्यात आली आहे. त्याचबरोबर शितल म्हात्रे यांनी सुध्दा तरुणाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे नेमकं काय प्रकरण हे अद्याप उजेडात आलेलं नाही. मारहाण झालेल्या तरुणाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे.
अनेकदा राजकारणी लोकांकडून अनेकदा सामान्य नागरिकांना मारहाण झाल्याचे पाहावयास मिळाले आहे. नुकताचे उघडकीस आलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. त्यामुळे पोलिस नेमकी काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. परंतु आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर सगळा प्रकार उघडकीस येईल असं पोलिसांचं म्हणणं आहे.