मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. आताही त्यांनी मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यानं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला जातोय. तसंच राज्यपालांवर जोरदार टीकाही सुरु आहे. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, असं स्पष्ट केलंय. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) परत येतील तेव्हा ते राज्यपालांना भेटतील, असंही केसरकर यांनी सांगितलं.
केसरकर म्हणाले की, आज लोकांच्या भावनेशी निगडित चर्चा सुरु आहे. राज्यपालांच्या वक्तव्याबद्दल चर्चा सुरु आहे. राज्यपालांसारख्या वक्तींबद्दल चर्चा सुरु आहे. राज्यपालांसारख्या व्यक्तीबद्दल आम्ही बोलण्यासाठी विचार करावा लागतो. राज्यपालांच्या भाषणात जो उल्लेल झाला ते लिखित भाषण आहे. या भाषणात महाराष्ट्राच्या हिताचा, इतर भाषिकांचाही समावेश आहे. असा वेगळा उल्लेख असता तर योग्य होतं. मुंबईवर महालक्ष्मीचा, सिद्धिविनायकाचा आशीर्वाद आहे. गुजरात वेगळं झाल्यापासून त्यांना वेगळी राजधानी देण्यात आली. सर्वोत्कृष्ट वकील आणि डॉक्टर महाराष्ट्रात आहेत.
जी वादग्रस्त वक्तव्ये लिहून दिली आहेत त्यात सुधारणा झाली पाहिजे. भाषण लिहिणाऱ्या त्या व्यक्तींना याबाबत माहिती असायला हवी. पुढच्या काळात असे वक्तव्य होऊ नये यासाठी मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेतील. दिल्लीतही हा विषय काढणार आहेत. आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाहीत. सोमवारी मुख्यमंत्री परत येतील तेव्हा ते राज्यपालांना भेटतील. काय बोलत आहे हे त्यांना विचारला हवं. मी बोलू शकत नाही. राज्यपालांच्या वक्तव्यावर कुणीही सहमत नाही. एखाद्याच्या तोंडून वाक्य निघून जातं त्याला कसं घ्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. सोमवारी मुख्यमंत्री राज्यपालांना पत्र देतील, असंही केसरकरांनी सांगितलं.
माझ्या सारख्या माणसानं प्रशासनात काम केलेलं आहे. त्यांची भाषणं लिहिली जातात. गुजरात आणि राजस्थान इथल्या लोकाचं इथे सहभाग आहे, असं जर हे वाक्य असतं तर आज हे घडलं नसतं. सगळ्यात जास्त मोठं योगदान पारशी कम्युनिटीचंही आहे. मराठी माणूस तर आहेच पण पारशी लोकांचाही सहभाग आहे. मुंबईला आर्थिक राजधानी मानलं जातं. एकही मनुष्य इथे पैसे घेऊन आले नाहीत. गुजराती समाजात व्यापार करायची परंपरा आहे. एखाद्याच्या तोंडून वाक्य निघून जातं त्याला कसं स्वीकारावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असंही केसरकर म्हणाले.
शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यांच्याबाबत मी बोलणं योग्य नाही. मात्र, जनमताचा कल लक्षात घेऊन आम्ही आमची भूमिका मांडू, असंही केसरकर यांनी सांगितलं. तसंच संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुनही केसरकर यांनी टीका केलीय. महिलांचा अपमान बाळासाहेब ठाकरे असताना कधीही करायचे नाहीत. संजय राऊत हे अशा एका पक्षाचे प्रवक्ते आहेत ज्यात महिलांचा आदर केला जातो. आता त्यांच्यावर कारवाई करणार का? असा सवाल करत तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, असा टोलाही केसरकर यांनी लगावलाय.