शिर्डी : आजपासून 2023 हे वर्ष सुरु होतंय. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिर्डीत जात साईंचं दर्शन घेतलं. यावेळी केसरकर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचं तोंड भरून कौतुक केलंय. यासह विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय.
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आदर आहे. कटूता कमी करणं उद्धवजींच्या हातात आहे. मी त्यांचा आदर ठेवणारा मनुष्य आहे.उद्धव ठाकरे भेटले तेव्हा मी त्यांना काहीच उत्तर दिलं नव्हतं, असं केसरकर म्हणाले आहेत.
जेव्हा घर पेटतं तेव्हा आधी आग विजवावी लागतं. कशामुळे लागली ते नंतर बघू .अगोदर आपण आपल घर सुरक्षित ठेवू या. असं मी उद्धवजींना बोललो होतो. मला ते बोलले त्याचं दु:ख वाटलं नाही. पण जे काही माध्यमांत दाखवलं गेलं त्यामुळे भावना दुखावल्या गेल्या. असं काम होता कामा नये , प्रेमाचा आदर आहे तो कमी होता कामा नये. मी सगळयांची उत्तर देईल, असंही केसरकर म्हणालेत.
अजितदादा पवार निर्मळ मनाचं व्यक्तीमत्व आहे. ते बाहेरून कठोर वाटत असले तरी त्यांचं मन निर्मळ आहे. अजीतदादा बोलताना फटकळ बोलतीत मात्र विरोधी पक्षनेता कसा असावा तर त्यांच्यासारखा असावा, असं वाटतं, अशा शब्दात दीपक केसरकरांनी अजित पवारांचं कौतुक केलंय.
साईबाबांकडे काही मागण्याची गरज पडत नाही ते सर्व काही देतात. राज्यात सुख-समृद्धी नांदावी म्हणून साईं चरणी प्रार्थना केली, असं केसरकर म्हणालेत.