Delhi Election Date : महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर झालेल्या आरोपांवर EC कमिशनने दिलं उत्तर

| Updated on: Jan 07, 2025 | 3:39 PM

Delhi Election Date : आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. दिल्लीतल्या विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारीला निवडणूक झाली. मतमोजणी 8 फेब्रुवारीला होईल.

Delhi Election Date : महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर झालेल्या आरोपांवर EC कमिशनने दिलं उत्तर
Rajiv Kumar
Follow us on

या वर्षाच्या सुरुवातीला पहिली विधानसभा निवडणूक दिल्लीत होत आहे. त्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी पत्रकार परिषदेच्या आरंभी देशातील नागरिक आणि मतदारांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. राजीव कुमार यांची ही तशी शेवटची पत्रकार परिषद आहे. कारण 18 फेब्रुवारीला ते सेवानिवृत्त होत आहेत. 2024 हे जगात निवडणूक वर्ष ठरलं. दोन-तृतीयांश लोकसंख्येने मतदान केलं. 2024 साली भारतात आठ राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूक झाली. चांगलं वातावरण होतं. अनेक नवीन किर्तीमान लोकसभा निवडणुकीत प्रस्थापित झाले असं राजीव कुमार यांनी सांगितलं.

निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर जे आरोप झाले, त्याचही उत्तर दिलं. मतदार याद्यात फेरफार, काही मतदारसंघात 50 हजार मतदार वाढले, ईव्हीएम हॅक होऊ शकत का? किंवा बॅटरी असे वेगवेगळे आरोप झाले. पण “EVM कधीही हॅक होऊ शकत नाही. ईव्हीएम छेडछाडचा आरोप निराधार आहे. ईव्हीएममध्ये वायरस किंवा बग नाही. ईव्हीएम फूलप्रूफ डिवाईस आहे” असं स्पष्टपणे सांगितलं. निवडणूक हरल्यानंतर जे आरोप होतात ते त्यांनी खोडून काढले.

दिल्लीची निवडणूक कधी?

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं की, दिल्लीमध्ये सध्या 1 कोटी 55 लाख मतदारसंघात आहेत. 83 लाखापेक्षा जास्त पुरुष मतदार आहेत. 71.74 लाख अधिक महिला मतदार आहेत. दिल्लीत विधानसभेच्या 70 जागांसाठी एकाचवेळी मतदान होणार आहे. 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 8 फेब्रुवारीला मतमोजणी होईल.

हेच भारतीय लोकशाहीच खर सौंदर्य

“2020 पासून 30 राज्यात निवडणुका झाल्या. त्यात 15 राज्यात वेगवेगळ्या पक्षांची सरकारं आली. हेच भारतीय लोकशाहीच खर सौंदर्य आहे. यातून निवडणुका निष्पक्ष आहेत हे दिसून येतं. भारतीय मतदार जागरुक आहे, तोच उत्तर देतो” असं राजीव कुमार म्हणाले.

केजरीवाल कुठून निवडणूक लढवणार?

माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. नवी दिल्ली ही VIP सीट आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसचे संदीप दीक्षित आणि भाजपच्या प्रवेश वर्मा यांचं आव्हान आहे. केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून मागच्या दोन निवडणुका जिंकल्या आहेत. भाजप आणि काँग्रेस दोघांनी आपल्या स्टार नेत्यांना उतरवलं आहे. इथे सामना रंगतदार असणार आहे.