मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे सूरतवरून गुवाहाटी (Guwahati) इथं गेलेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आलाय. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत संजय राठोड गेले आहेत. संजय राठोड मंत्री असताना त्यांच्यावर पूजा राठोड आत्महत्या प्रकरणात आरोप झाले होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज फेसबूक लाईव्हवरून (Facebook Live) संवाद साधला. यावेळी ठाकरे म्हणाले, संजय राठोड (Rathod) यांच्यावर वाईट आणि गंभीर आरोप झाले. तरीही त्यांना मी सांभाळून घेतले. आता मात्र ते एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत.
संजय राठोड यांच्यावर वाईट आरोप झाले. मात्र, त्यानंतरसुद्धा मी त्यांना सांभाळलं, असं मुख्यमंत्री म्हणाले. संजय राठोड हे आमदार आहेत. मध्यंतरी त्यांचं मंत्रीपद गेलं. मंत्रीपद मिळावं, यासाठी त्यांनी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी यवतमाळातील शिवसेनेचे कार्यकर्ते संजय राठोड यांच्यासोबत होते. परंतु, आता संजय राठोड हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेत. त्यामुळं ते मंत्री असताना मी त्यांना काय कमी केलं होतं. त्यांच्यावर वाईट आरोप झालेत. त्यावेळी मी त्यांना सांभाळून घेतलं होतं, असंही ठाकरे आजच्या फेसबूक लाईव्हमध्ये म्हणाले. नुकतंच संजय राठोड यांनी बंजारा समाजाच्या मदतीनं ठाकरेंवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. मंत्रीमंडळात पुन्हा घेण्यात यावं, अशी त्यांनी मागणी होती. पण, त्यावर काही निर्णय झाला नव्हता. त्यामुळं संजय राठोड हे एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले असावेत. यावेळी ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केलेत. त्यांनासुद्धा मी काही कमी केले नसल्याचं ते म्हणाले. माझ्याकडची दोन खाती शिंदेंना दिली. माझं मुख्यमंत्री पद मान्य नसणं ही राक्षसी प्रवृत्ती असल्याचं ते म्हणाले.
टिकटॉक स्टार पूजा राठोड मृत्यू प्रकरणात शिवसेनेचे तत्कालीन मंत्री असलेले संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते. तिसऱ्या माळ्यावरून उडू मारून पूजानं आत्महत्या केली होती. त्या प्रकरणात विरोधकांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. शेवटी संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. पूजासोबत संजय राठोड यांच्या संवादाची क्लीप बाहेर आली होती. त्यावरून त्यांना विरोधकांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.