मुंबई : छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री कुठे आहेत?, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर ते का बोलत नाहीत, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. पोलिसांचा तपास नेमक्या कोणत्या दिशेने सुरु आहे हे गृहमंत्र्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली. (Devendra fadanvis Criticized home Minister Anil Deshmukh pooja Chavan Case)
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढतो आहे. हरेक दिवशी नवनवे फोटो आणि ऑडिओ क्लिपबाहेर येत आहे. अशा परिस्थितीतही पोलीस हातावर हात ठेऊन गप्प आहेत. पोलिसांचा तपास नेमका कोणत्या दिशेने सुरु आहे हे राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीकास्त्र सोडलं. छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री कुठे आहेत?, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर ते का बोलत नाहीत. तपास नेमक्या दिशेने सुरु आहे, हे राज्यातील जनतेला गृहमंत्री नेमकं का सांगत नाहीत?, त्या ऑडिओ क्लिपमधला आवाज नेमका कुणाचा आहे हे पोलिस का सांगत नाहीत किंवा पडताळून का पाहत नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती फडणवीसांनी गृहमंत्र्यांवर केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अधिवेशनापासून म्हणजेच विरोधकांच्या आणि जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. जे अधिवेशनात मांडायचे आहेत. त्यासाठी आम्ही पूर्ण अधिवेशन घेण्याची मागणी केल्याचं फडणवीसांनी सांगितलं. पण सरकार कायद्यात न बसणारं अधिवेशन घेत असल्याची टीका त्यांनी केलीय.
संजय राठोड प्रकरण असो की वीज कापण्याचं असो, विरोधी पक्ष आक्रमक राहील, असा इशाराही फडणवीसांनी सरकारला दिला आहे. अशा प्रकरणात उघडं पडण्याच्या भीतीने सरकार अधिवेशनापासून पळ काढत असल्याची टीका त्यांनी केली आहे. जनतेच्या प्रश्नावर सरकारला काही देणंघेणं नाही. बिझनेस अॅडव्हायझरी कमिटीवरुन वॉकआऊट करत असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.
(Devendra fadanvis Criticized home Minister Anil Deshmukh pooja Chavan Case)
हे ही वाचा :
‘मंत्री 10 हजार लोकं जमवतो आणि अधिवेशनाला मात्र कोरोना कोरोना’, फडणवीसांकडून ठाकरे सरकारची खिल्ली