देशातील लोकांना ‘कर्मयोग’ आवडतो, ‘बोलघेवडेपणा’ नाही; फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

| Updated on: Nov 18, 2020 | 8:07 PM

बिहार विधानसभा निवडणुकीत आपण घसघशीत यश मिळवलं. त्याचं कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणलेल्या गरीब जनकल्याण योजनेला जातं. या योजनेचा लाभ गरीबातल्या गरीबाला मिळाला. मोदीच आपले तारणहार आहेत हे लोकांच्या लक्षात आल्याने त्यांनी आपल्याला निवडून दिलं, असं विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. (devendra fadnavis addressing party worker in mumbai)

देशातील लोकांना कर्मयोग आवडतो, बोलघेवडेपणा नाही; फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
Follow us on

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीत आपण घसघशीत यश मिळवलं. त्याचं कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणलेल्या गरीब जनकल्याण योजनेला जातं. या योजनेचा लाभ गरीबातल्या गरीबाला मिळाला. मोदीच आपले तारणहार आहेत हे लोकांच्या लक्षात आल्याने त्यांनी आपल्याला निवडून दिलं, असं सांगतानाच लोकांना कर्मयोग आवडतो. बोलघेवडेपणा आवडत नाही, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. (devendra fadnavis addressing party worker in mumbai)

मुंबईत भाजपच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी कोरोनाच्या मुद्द्यावरून राज्यातील राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. बिहारच्या निवडणुकीत माझा खारीचा वाटा आहे. मोंदींच्या गरीब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांनी आपल्याला जिंकून दिलं. मोदी तारणहार असल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानेच आपला विजय झाला. लोकांना कर्मयोग आवडतो. बोलघेवडेपणा आवडत नाही, हे या निवडणुकीतून दिसून येतं, असं फडणवीस म्हणाले.

हे विश्वासघातकी सरकार

राज्यात कोरोनाचा हाहाकार असताना या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडलं. शेतकरी, बाराबलुतेदार, दुकानदार, रिक्षा आणि टॅक्सीचालकांसह कुणालाच या सरकारने मदत केली नाही. तुम्ही मेला तरी चालेल पण तुम्हाला मदत करणार नाही असंच या सरकारचं धोरण राहिलं आहे. राज्यात कोरोनाचं संकट असताना या सरकारचं बदल्या करा आणि माल कमवा असंच धोरण होतं. या सरकारने बदल्या करण्याचा जणू धडाकाच लावला होता. एका बदलीसाठी चार चार एजंटांचे फोन जात होते, असा गंभीर आरोप करतानाच हे सरकार विश्वासघातकी आहे, अशी टीका त्यांनी केली.

सत्ताधाऱ्यांची लक्तरं वेशीवर टांगण्याची वेळ आलीय

राज्यावर कोरोनाचं संकट असताना या सरकारला कोरोनाची चिंता नव्हती. यांना कोरोनाचं कॉन्ट्रॅक्ट कुणाला द्यायचं याची चिंता होती. आम्ही या लोकांना उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही. कोरोनाच्या काळातही काही लोकांनी आपलं चांगभलं केलं. मयताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं. तरीही आम्ही कोरोनावरून सरकारवर टीका केली नाही. आम्हाला संकटात सरकारला साथ द्यायची होती. पण आता मात्र सरकारची लक्तरं वेशीवर टांगण्याची वेळ आली आहे, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

कोरोना मृत्यूंची संख्या वीस हजारावर

देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण राज्यातच का?, असा सवाल माझा स्वत:ची पाठ थोपवून घेणाऱ्यांना आहे. राज्यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातच का?, असे सवाल करतानाच राज्यातील कोरोना मृत्यूचा आकडा दहा हजार असल्याचं सांगण्यात येतं. पण हा आकडा चुकीचा आहे. प्रत्यक्षात हा आकडा वीस हजार असेल, असा दावाही त्यांनी केला.

 

संबंधित बातम्या:

मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार; देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

“उर्जा मंत्री तुम्ही सावकार झालात, सावकारासारखी गरिबांकडून वसुली करत आहात”: देवेंद्र फडणवीस

‘बाळ कुणीही जन्माला घालो, ते आमचेच आहे, ही मानसिकता पूर्वीपासून’, गुलाबराव पाटलांचा भाजपला टोला

(devendra fadnavis addressing party worker in mumbai)