शरद पवार यांच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांचीही मोठी घोषणा

| Updated on: May 02, 2023 | 5:05 PM

शरद पवार यांच्या पुस्तकाची चर्चा असतानाच आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोठी घोषणा केली आहे. काय म्हटलंय त्यांनी वाचा...

शरद पवार यांच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांचीही मोठी घोषणा
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्व्हा शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी आज निवृत्तीची घोषणा केली आहे. आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही घोषणा केल्याने राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी देखील शरद पवारांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, आता तरी मी एवढेच म्हणेल हा पवार साहेबांचा वैयक्तिक आणि राष्ट्रवादीचा आंतरिक निर्णय किंवा फैसला आहे. या स्टेजला याच्यावर अधिक बोलणं योग्य होणार नाही.’

योग्य वेळी मी पण पुस्तक लिहिणार – फडणवीस

‘पक्षातही अनेक मंथन सुरू आहे त्यामुळे नेमकी परिस्थिती काय आहे हे लक्षात आल्यानंतरच त्यावर योग्य कमेंट देता येईल. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यामुळे या स्टेजला मी त्यावर बोलणं योग्य होणार नाही. पवार साहेबांच पुस्तक मी वाचलेलं नाही मात्र मला ही एक पुस्तक लिहायचं आहे. ते मी योग्य वेळी लिहिणार. त्यामुळे नेमकं त्यांनी काय लिहिलं आहे. मला काय वाटते अशा अनेक गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी मी पुस्तक लिहिल त्यात तुम्हाला दिसेलं.’

‘लोक माझे सांगाती’

शरद पवार यांनी आपल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात अनेक मोठे खुलासे केले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान काय घडलं. याबाबत ही या पुस्तकात पवारांनी अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. सकाळचा शपथविधी, राष्ट्रवादीची शिवसेनेसोबत युती आणि उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ अशा अनेक विषयांवर त्यांनी या पुस्तकात भाष्य केले आहे.

शरद पवार यांच्या या पुस्तकाबाबत चर्चा सुरु असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोठी घोषणा केली आहे.

शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून राष्ट्रवादीने नेते आणि कार्यकर्त्ये आग्रही आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देखील शरद पवार यांना आपला निर्णय मागे घेण्यासाठी विनंती केली जात आहे. अनेक नेते सिलव्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यामुळे आता शरद पवार पुढे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे आपल्या पुस्तकात काय खुलासे करतील अशी देखील चर्चा आता रंगू लागली आहे. पहाटेचा शपथविधी याबाबत अजूनही राज्यातील जनतेच्या मनात प्रश्न आहे. एकीकडे पवारांच्या सहमतीनेच शपथविधी झाल्याचा फडणवीसांचा दावा आहे. शरद पवार यांनी मात्र याबाबत मला माहित नसल्याचं म्हटलं आहे.