मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे (Devendra Fadnavis criticize Sanjay Raut). “कुणीही सरकार पाडण्याचा प्रयत्न करत नाही. तरीही सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा कांगावा करायचा. त्यापेक्षा कोरोनाकडे लक्ष दिलं पाहिजे”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला (Devendra Fadnavis criticize Sanjay Raut).
“स्वत:च मारुन घ्यायचं आणि स्वत:च रडायचं, ही एक नवी पद्धत आहे. ही पद्धत जर अवलंबली तर आपल्या अपयशापासून लोकांची नजर बाजूला होते. त्यामुळे तसाच हा प्रकार आहे. कुणीही सरकार पाडण्याचा प्रयत्न करत नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“सरकार पाडताय, असा आपणच कांगावा करायचा. त्याच विषयावर मुलाखती करायच्या आणि त्यावरच बोलायचं, जेणेकरुण खरी जी कोरोनाची लढाई आहे, कोरोनाचे जे प्रश्न आहेत ते दूर होतील, असा हा प्रयत्न आहे. मला असं वाटतं की, त्यांनी कोरोनाकडे लक्ष दिलं पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, संजय राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अनेक ठिकाणी सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं. “अनेक राज्यकर्ते आपापल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यांनी आणखी कठोरपणे काम केलं पाहिजे. या सगळ्यातून राजकारण दूर राहिलं पाहिजे. पण, काही ठिकाणी सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सरकार पाडणं हे कोरोना काळातील काम नाही”, असं संजय राऊत म्हणाले.
“महाभारताचं युद्ध 21 दिवस चाललं. मात्र, आता शंभर दिवस उलटून गेले तरी कोरोनाशी युद्ध सुरु आहे. ही वेळ राजकारण करण्याची वेळ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र मिळून काम करण्याची वेळ आहे”, असंदेखील संजय राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या :
जेव्हा चिनी संरक्षण मंत्र्यांनी शरद पवारांना अज्ञातस्थळी नेले होते…
शिवसेना नसती तर भाजपचे 40-50 आमदारच असते, मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला : शरद पवार
फडणवीस राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते, त्यांना काही माहित नाही : शरद पवार